बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पक्षा अंतर्गत कुडाळ आणि सावंतवाडी येथील पक्षाची काही पदे नुकतीच नियुक्त करण्यात आली. यामध्ये अकमारुरजझ़ा अब्बास अली ख़ान उप तालुकाप्रमुख सावंतवाडी, बिस्मिल्ला रियाज़ खान महिला उप तालुका प्रमुख सावंतवाडी, रिझ़वाना नईम शेख़ महिला तालुकाप्रमुख कुडाळ, मुख़्तार गफूर शेख़ सचिव सावंतवाडी तालुका ह्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.
कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार व ज्येष्ठ नेते वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते, अल्पसंख्यांक जिल्हाप्रमुख मस्जिद बटवाले, अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष रियाज़ खान यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी आबा सावंत, शब्बीर मणियार, अश़पाक कुडाळकर, निसार शेख़, जावेद शाह,मंदार शिरसाट उपस्थित होते.