मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या कट्टा पं.शि.प्र. मं.कट्टा संचालित वराडकर हायस्कुल आणि ज्यु. कॉलेज आणि वराडकर इंग्लिश मिडीयम स्कुल यांच्या संयुक्त सहकार्याने भारताच्या ‘चांद्रयान -३ मोहिम’ संदर्भातील विद्यार्थ्यांसाठीचे मार्गदर्शक आणि उपयुक्त विशेष व्याख्यान हायस्कूलच्या सिद्धिविनायक सभागृहात नुकतेच संपन्न झाले.
टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च सेंटर मुंबई मधील शास्त्रज्ञ डॉ. अमित लाड यांचे हे विशेष व्याख्यान शाळेच्या आणि पंचक्रोशीतील इतरही विद्यार्थ्यांसाठी आयोजित केले होते. या व्याख्यानाच्या आयोजनात कुणकवळे गांवचे सुपुत्र रिसर्च अधिकारी श्री. देविदास पवार यांचे विशेष सहकार्य प्राप्त झाले. तसेच टी.आय.एफ.एस.चे रिसर्च ऑफिसर यश वेद आणि विजय कदम यांचेही या व्याख्यानात बहुमूल्य सहकार्य लाभले.
शाळेच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमानंतर झालेल्या प्रश्नोत्तरात चौकसपणे सहभाग घेतला. अंतराळ शास्त्रज्ञ डॉ. अमित लाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यासाठी उपस्थित मुलांचे आणि शिक्षकांची प्रशंसा केली.
या व्याख्यानाला संस्थेचे अध्यक्ष अजयराज वराडकर, सचिव सुनील नाईक, सचिव विजयश्री देसाई, शालेय समिती अध्यक्ष सुधीर वराडकर, शाळेचे मुख्याध्यापक संजय नाईक, वराडकर इंग्लिश मिडीयम स्कुलचे प्रिन्सिपल ऋषिकेश नाईक, पर्यवेक्षिका देवयानी गावडे, दोन्हीही युनिटचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ, पालक, आजी-माजी विद्यार्थी आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे विज्ञान शिक्षक श्री. प्रकाश कानूरकर यांनी तर मंच व्यवस्थापन शिक्षक भाट यांनी केले.