28 C
Mālvan
Friday, October 18, 2024
IMG-20240531-WA0007
ADTV Pandit Sir

मालवण येथे ‘होऊ द्या चर्चा विचारा प्रश्न’ अभियानांतर्गत काॅर्नर सभा संपन्न ; आमदार वैभव नाईक, ज्येष्ठ नेते गुरुनाथ खोत व रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक प्रदीप बोरकर, महिला आघाडी प्रमुख जान्हवी सावंत व तालुका प्रमुख हरी खोबरेकर यांची प्रमुख उपस्थिती.

- Advertisement -
- Advertisement -

हिणकस जुमलेबाजी आणि एकांगी विचारसरणी यामुळे केंद्र व राज्य सरकारला देश व महाराष्ट्र नेमका कुठे नेऊन ठेवायचाय ते सामान्य माणसाला कळत नाही ; माजी नगरसेवक नितीन वाळके यांनी सरकारला धरले धारेवर.

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण मालवण शहरात काल ४ ऑक्टोबरला संध्याकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची ‘होऊ द्या चर्चा विचारा प्रश्न’ अभियानांतर्गत काॅर्नर सभा संपन्न झाली. फोवकांडा पिंपळ येथे आयोजीत केलेल्या या अभियानाच्या काॅर्नर सभेला मंचावरुन ज्येष्ठ शिवसेना नेते आमदार वैभव नाईक, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक प्रदीप बोरकर, ज्येष्ठ शिवसेना नेते गुरुनाथ खोत,महिला जिल्हा आघाडी प्रमुख जान्हवी सावंत, मालवण तालुका प्रमुख हरी खोबरेकर, माजी नगरसेवक नितीन वाळके यांनी संबोधीत केले. तालुका स्तरीय प्रमुख महिला नेत्या पूनम चव्हाण यांनी या काॅर्नर सभेचे सूत्रसंचालन केले. यावेळी मंचावर माजी नगरसेवक व माजी बांधकाम सभापती मंदार केणी, शहर प्रमुख पृथ्वीराज ऊर्फ बाबी जोगी, मच्छिमार नेते भाई कासवकर, सौ रश्मी परुळेकर, माजी उपनगराध्यक्ष व माजी नगरसेवक महेश जावकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

सभेच्या सुरवातीला महिला आघाडी जिल्हा प्रमुख जान्हवी सावंत यांनी केंद्र सरकारच्या महिलांविषयी धोरण व घरगुती जीवनावश्यक वस्तूंच्या महागाईबाबत केंद्र व राज्य सरकारवर जाहीर हल्ला केला. त्यानंतर मालवणचे माजी नगरसेवक नितीन वाळके यांनी केंद्र व राज्य सरकारवर ‘९’ प्रश्नांची सरबत्ती करत त्यांना धारेवर धरले. यात प्रामुख्याने पंतप्रधानांवर ‘परिधानमंत्री’ म्हणजे दिवसातून सतत महागडे कपडे बदलणारे परंतु सामान्य जनतेच्या भल्याविषयी देणे घेणे नसणारे पंतप्रधान असा टोला लगावून अनेक प्रश्न विचारले. माजी नगरसेवक नितीन वाळके यांनी ‘पि एम केअर फंडला आर टी आय’ च्या बाहेर ठेवणे, पत्रकारांना समाधानकारक उत्तरे न देणे , नोटबंदी, केवळ अक्षय कुमार सारख्या अभिनेत्याकडून खोट्या मुलाखती आयोजीत करणे, खासदार व आमदारांचा घोडे बाजार करणे अशा अनेक मुद्द्यांवर सरकारवर आरोप केले.

या काॅर्नर सभेसाठी कार्यरत राहून आखणी करणारे तालुका प्रमुख हरी खोबरेकर यांनी दोन्ही सरकारवर सामान्य शेतकरी, कष्टकरी व मच्छिमार यांना चिरडणारे असेच हे सरकार असल्याची टीका करत कोणालाही तात्विक आमने सामने यायचे असेल तर त्यांच्याशी चर्चेला जायला व सर्व स्तरांवर आपण सज्ज असल्याची गर्जना केली. त्यानंतर कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव यांनी ‘होऊ दे चर्चा विचारा प्रश्न अभियान’ हे या दोन्ही सरकारच्या नाकर्तेपणामुळेच घ्यावे लागले अशी टीका करताना भाजपाच्या राजकीय षडयंत्रात २०१४ साली इतर सामान्य जनतेप्रमाणेच आपणही फसवलो गेलो व त्याची योग्य ती शिक्षा या निवडणुकीत भाजप व संबंधीत पक्षांना जनता दिल्याशिवाय रहाणार नाही असा विश्वास व्यक्त केला. आमदार वैभव नाईक यांनी वाढती महागाई, बेरोजगारी, आरोग्य व शैक्षणिक विषयावर सरकार चौफेर शाब्दिक हल्ला चढवला.

त्यानंतर ज्येष्ठ नेते गुरुनाथ खोत यांनी कोकणात शिवसेना रुजवताना घेतलेले कष्ट, तेंव्हा साथ दिलेले शिवसैनिक व आत्ता गद्दारी करणारे भुरटे यांच्यावर भाष्य करुन शिवसेनेला कधीच भीती नव्हती व नसेल असे प्रतिपादन केले. सभेच्या शेवटच्या भाषणात रत्नागिरी सिंधुदुर्गचे समन्वयक प्रदीप बोरकर यांनी उपस्थित जनतेला बोलते करुन त्यांच्याकडून केंद्र व राज्य सरकारच्या नकारात्मक सामाजिक धोरणांबद्दल मतं ऐकून घेतली आणि येत्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसैनिकांची ताकद सगळ्यांना सहज दिसेलच असा विश्वास व्यक्त केला. सभेच्या शेवटी पूनम चव्हाण यांनी उपस्थित जनता, शिवसैनिक, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी व मान्यवरांचे आभार मानले.

सभेनंतर आमदार वैभव नाईक यांनी मंचावरुन खाली येत जवळपास अर्धा ते पाऊण तास जनसामान्यांमध्ये मिसळून प्रत्येकाशी वैयक्तिक संवादही साधला.

या सभेला मंचावरील मान्यवरांव्यतिरिक्त उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, अल्पसंख्याक शहर प्रमुख फारुख़ मुकादम, ज्येष्ठ नेते उमेश मांजरेकर, युवा सेना प्रमुख समन्वयक मंदार ओरसकर, माजी नगरसेवक व माजी बांधकाम सभापती यतीन खोत, आमदार वैभव नाईक यांचे स्विय सहाय्यक श्री राऊळ, दत्तगुरु पोईपकर, युवा नेते तपस्वी मयेकर, माजी नगरसेविका दर्शना कासवकर, तृप्ती मयेकर, आकांक्षा शिरपुटे, सेजल सन्मेष परब, प्रसाद आडवणकर, सौ. सामंत, नरेश हुले, माजी नगरसेवक महेंद्र म्हाडगुत, मनोज मोंडकर, आचरा विभाग प्रमुख समीर लब्दे, दीपक देसाई, ज्येष्ठ शिवसैनिक यशवंत गांवकर, परुळेकर, सोमनाथ लांबोर, वरची देवलीचे युवासेना शाखाप्रमुख गणेश चव्हाण,सरपंच अमोल वस्त, कोळंब सरपंच सिया धुरी,सुर्वी लोणे, राजेश गांवकर, प्रवीण लुडबे,अंजना सामंत, नंदा सारंग, वैभव खोबरेकर, अक्षय रेवंडकर,चंदू खोबरेकर, तेजस लुडबे, संतोष अमरे तसेच असंख्य युवा व युवती सेनेचे कार्यकर्ते, महिला आघाडी शिवसैनिक, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसैनिक, आजी व माजी पदाधिकारी, मालवणचे नागरीक उपस्थित होते.

या काॅर्नर सभेपूर्वी मालवण तालुक्यातल्या पोईप येथेही काॅर्नर सभा संपन्न झाली.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

हिणकस जुमलेबाजी आणि एकांगी विचारसरणी यामुळे केंद्र व राज्य सरकारला देश व महाराष्ट्र नेमका कुठे नेऊन ठेवायचाय ते सामान्य माणसाला कळत नाही ; माजी नगरसेवक नितीन वाळके यांनी सरकारला धरले धारेवर.

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण मालवण शहरात काल ४ ऑक्टोबरला संध्याकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची 'होऊ द्या चर्चा विचारा प्रश्न' अभियानांतर्गत काॅर्नर सभा संपन्न झाली. फोवकांडा पिंपळ येथे आयोजीत केलेल्या या अभियानाच्या काॅर्नर सभेला मंचावरुन ज्येष्ठ शिवसेना नेते आमदार वैभव नाईक, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक प्रदीप बोरकर, ज्येष्ठ शिवसेना नेते गुरुनाथ खोत,महिला जिल्हा आघाडी प्रमुख जान्हवी सावंत, मालवण तालुका प्रमुख हरी खोबरेकर, माजी नगरसेवक नितीन वाळके यांनी संबोधीत केले. तालुका स्तरीय प्रमुख महिला नेत्या पूनम चव्हाण यांनी या काॅर्नर सभेचे सूत्रसंचालन केले. यावेळी मंचावर माजी नगरसेवक व माजी बांधकाम सभापती मंदार केणी, शहर प्रमुख पृथ्वीराज ऊर्फ बाबी जोगी, मच्छिमार नेते भाई कासवकर, सौ रश्मी परुळेकर, माजी उपनगराध्यक्ष व माजी नगरसेवक महेश जावकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

सभेच्या सुरवातीला महिला आघाडी जिल्हा प्रमुख जान्हवी सावंत यांनी केंद्र सरकारच्या महिलांविषयी धोरण व घरगुती जीवनावश्यक वस्तूंच्या महागाईबाबत केंद्र व राज्य सरकारवर जाहीर हल्ला केला. त्यानंतर मालवणचे माजी नगरसेवक नितीन वाळके यांनी केंद्र व राज्य सरकारवर '९' प्रश्नांची सरबत्ती करत त्यांना धारेवर धरले. यात प्रामुख्याने पंतप्रधानांवर 'परिधानमंत्री' म्हणजे दिवसातून सतत महागडे कपडे बदलणारे परंतु सामान्य जनतेच्या भल्याविषयी देणे घेणे नसणारे पंतप्रधान असा टोला लगावून अनेक प्रश्न विचारले. माजी नगरसेवक नितीन वाळके यांनी 'पि एम केअर फंडला आर टी आय' च्या बाहेर ठेवणे, पत्रकारांना समाधानकारक उत्तरे न देणे , नोटबंदी, केवळ अक्षय कुमार सारख्या अभिनेत्याकडून खोट्या मुलाखती आयोजीत करणे, खासदार व आमदारांचा घोडे बाजार करणे अशा अनेक मुद्द्यांवर सरकारवर आरोप केले.

या काॅर्नर सभेसाठी कार्यरत राहून आखणी करणारे तालुका प्रमुख हरी खोबरेकर यांनी दोन्ही सरकारवर सामान्य शेतकरी, कष्टकरी व मच्छिमार यांना चिरडणारे असेच हे सरकार असल्याची टीका करत कोणालाही तात्विक आमने सामने यायचे असेल तर त्यांच्याशी चर्चेला जायला व सर्व स्तरांवर आपण सज्ज असल्याची गर्जना केली. त्यानंतर कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव यांनी 'होऊ दे चर्चा विचारा प्रश्न अभियान' हे या दोन्ही सरकारच्या नाकर्तेपणामुळेच घ्यावे लागले अशी टीका करताना भाजपाच्या राजकीय षडयंत्रात २०१४ साली इतर सामान्य जनतेप्रमाणेच आपणही फसवलो गेलो व त्याची योग्य ती शिक्षा या निवडणुकीत भाजप व संबंधीत पक्षांना जनता दिल्याशिवाय रहाणार नाही असा विश्वास व्यक्त केला. आमदार वैभव नाईक यांनी वाढती महागाई, बेरोजगारी, आरोग्य व शैक्षणिक विषयावर सरकार चौफेर शाब्दिक हल्ला चढवला.

त्यानंतर ज्येष्ठ नेते गुरुनाथ खोत यांनी कोकणात शिवसेना रुजवताना घेतलेले कष्ट, तेंव्हा साथ दिलेले शिवसैनिक व आत्ता गद्दारी करणारे भुरटे यांच्यावर भाष्य करुन शिवसेनेला कधीच भीती नव्हती व नसेल असे प्रतिपादन केले. सभेच्या शेवटच्या भाषणात रत्नागिरी सिंधुदुर्गचे समन्वयक प्रदीप बोरकर यांनी उपस्थित जनतेला बोलते करुन त्यांच्याकडून केंद्र व राज्य सरकारच्या नकारात्मक सामाजिक धोरणांबद्दल मतं ऐकून घेतली आणि येत्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसैनिकांची ताकद सगळ्यांना सहज दिसेलच असा विश्वास व्यक्त केला. सभेच्या शेवटी पूनम चव्हाण यांनी उपस्थित जनता, शिवसैनिक, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी व मान्यवरांचे आभार मानले.

सभेनंतर आमदार वैभव नाईक यांनी मंचावरुन खाली येत जवळपास अर्धा ते पाऊण तास जनसामान्यांमध्ये मिसळून प्रत्येकाशी वैयक्तिक संवादही साधला.

या सभेला मंचावरील मान्यवरांव्यतिरिक्त उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, अल्पसंख्याक शहर प्रमुख फारुख़ मुकादम, ज्येष्ठ नेते उमेश मांजरेकर, युवा सेना प्रमुख समन्वयक मंदार ओरसकर, माजी नगरसेवक व माजी बांधकाम सभापती यतीन खोत, आमदार वैभव नाईक यांचे स्विय सहाय्यक श्री राऊळ, दत्तगुरु पोईपकर, युवा नेते तपस्वी मयेकर, माजी नगरसेविका दर्शना कासवकर, तृप्ती मयेकर, आकांक्षा शिरपुटे, सेजल सन्मेष परब, प्रसाद आडवणकर, सौ. सामंत, नरेश हुले, माजी नगरसेवक महेंद्र म्हाडगुत, मनोज मोंडकर, आचरा विभाग प्रमुख समीर लब्दे, दीपक देसाई, ज्येष्ठ शिवसैनिक यशवंत गांवकर, परुळेकर, सोमनाथ लांबोर, वरची देवलीचे युवासेना शाखाप्रमुख गणेश चव्हाण,सरपंच अमोल वस्त, कोळंब सरपंच सिया धुरी,सुर्वी लोणे, राजेश गांवकर, प्रवीण लुडबे,अंजना सामंत, नंदा सारंग, वैभव खोबरेकर, अक्षय रेवंडकर,चंदू खोबरेकर, तेजस लुडबे, संतोष अमरे तसेच असंख्य युवा व युवती सेनेचे कार्यकर्ते, महिला आघाडी शिवसैनिक, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसैनिक, आजी व माजी पदाधिकारी, मालवणचे नागरीक उपस्थित होते.

या काॅर्नर सभेपूर्वी मालवण तालुक्यातल्या पोईप येथेही काॅर्नर सभा संपन्न झाली.

error: Content is protected !!