मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या ग्रामीण रुग्णालयात उद्या २३ सप्टेंबरला सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत ‘आयुष्यमान भवः सामुदायिक आरोग्य केंद्र’ साप्ताहिक आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात प्रसुती आणि स्त्री रोग, नाक- कान- घसा, बालरोग, नेत्रविकार, शस्त्रक्रिया, मानसोपचार आदींवर सेवा उपलब्ध होणार आहेत.
या आरोग्य मेळावा सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.