24.6 C
Mālvan
Saturday, November 23, 2024
IMG-20240531-WA0007

महेश इंगळे हे अत्यंत समर्पित वृत्तीने आपले जीवन देवस्थान करिता समर्पित करून स्वामी भक्तांच्या सेवेत व सर्वसमावेशक कार्यप्रणाली द्वारे अहोरात्र झटत आहेत म्हणून आयकाॅन पुरस्काराचे योग्य मानकरी ; स्विमिंग ग्रुपच्या शिवशंकर बिंदेगेंचे मनोगत

- Advertisement -
- Advertisement -

मसुरे | प्रतिनिधी : श्री स्वामी समर्थांचे भक्त राज्यभरासह देशाच्या कानाकोपऱ्यात आहेत. अनेक स्वामी भक्त हे नियमीतपणे स्वामींच्या दर्शनाकरिता अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात येत असतात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने महेश इंगळे हे अत्यंत समर्पित वृत्तीने आपले जीवन देवस्थान करिता समर्पित करून स्वामी भक्तांच्या सेवेत अहोरात्र झटत आहेत. भाविकांना वेळोवेळी सर्वोत्तम सोई सुविधा व उत्तम दर्शन नियोजन करून कमीत कमी कालावधीत जास्तीत जास्त स्वामी भक्त कसे स्वामींचे दर्शन घेतील याकडे महेश इंगळे यांचा नेहमीच कटाक्षाने लक्ष असतो. त्यामुळे ते स्वतः स्वामींच्या सेवेत आपले जीवन समर्पित करून भाविकांना नेहमीच सुलभ स्वामी दर्शन व्हावे याकरिता वेळोवेळी विविध नियोजन करीत असतात.तसेच राजकीय सामाजिक शैक्षणिक सहकार धार्मिक आधी सर्वच क्षेत्रात सतत कार्य करण्याच्या उमेदीने झटत आहेत. त्यातच श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान सारख्या राज्यातील महत्त्वाच्या देवस्थानची जबाबदारीत स्वामी सेवा समजून गेल्या वीस वर्षांपासून अखंडपणे कार्यरत आहेत. त्यांचे कार्य पाहता भाविकांना स्वामी दर्शनाची उत्तम व्यवस्था करणारे महेश इंगळे हे आध्यात्मातील लोकनेते म्हणून ख्याती प्राप्त केलेली आहे. त्यांच्या या सर्व समावेशक कार्य प्रणालीमुळेच महेश इंगळे हे आयकॉन पुरस्काराचे मानकरी ठरले असल्याचे प्रतिपादन येथील स्विमिंग ग्रुपचे जेष्ठ सदस्य शिवशंकर बिंदगे यांनी केले. नुकतेच एका न्यूज चॅनलच्या वतीने सोलापूरचे पोलीस आयुक्त भालचंद्र माने यांच्या हस्ते महेश इंगळे यांना महाराष्ट्र आयकॉन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

हा पुरस्कार सोहळा सोलापूरच्या हॉटेल बालाजी सरोवर येथे संपन्न झाला. यानिमित्ताने आज येथील स्विमिंग ग्रुपच्या वतीने महेश इंगळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शिवशंकर बिंदगे बोलत होते. यावेळी मल्लिनाथ माळी, संतोष पराणे, बाबा सुरवसे, अशोक कलशेट्टी, अरविंद पाटील, संतोष जवळगेकर, सचिन किरनळ्ळी, ओंकारेश्वर उटगे, प्रसन्न हत्ते, शैलेश राठोड, राजू एकबोटे, बाळासाहेब एकबोटे, मधुकर सदाफुले, प्रभू कामाटी, हुसेन शेख, राजू कामाटी, ज्योतिबा फणसे, विशाल स्वामी, माहेश्वर स्वामी, बाळू जाधव, समर्थ पराणे, श्री पराणे, सुनील पवार, सैदप्पा इंगळे, श्रीकांत झिपरे व समस्त स्विमिंग परिवार उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!