26.4 C
Mālvan
Tuesday, September 17, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

ओरोसच्या साई काॅलेजचो ‘धयकालो’ मुंबईत गाजलो ; ५६ वा आंतर विद्यापीठ युवा महोत्सव.

- Advertisement -
- Advertisement -

कुडाळ | देवेंद्र गावडे ( उपसंपादक ) : मुंबई विद्यापीठ युवा महोत्सव अंतर्गत नुकतेच ओरोस येथील साई कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘धयकालो’ या एकांकिकेला यश मिळाले. यातील कलाकार प्रथमेश देसाई व सेजल शिरवणकर यांना पुरुष व स्त्री अभियानासाठी तर ‘धयकालो’ या एकांकिकेसाठी उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले आहे.

५६ व्या युवा महोत्सवाची कला, वाणिज्य आणि विद्यापीठ स्तरावरील अंतिम फेरी नॅशनल कॉलेज बांद्रा येथे संपन्न झाली. या अंतिम फेरीसाठी २४ संघ सहभागी होते. यात ओरोस महाविद्यालयाला उत्तेजनार्थ क्रमांक मिळाला. या एकांकिकेमध्ये महाविद्यालयाचे विद्यार्थी प्रथमेश साबाजी देसाई, सेजल संतोष शिरवंडकर, साक्षी दिगंबर तेली, दीपक मोहन कदम, ओमकार रविंद्र मालवे, रोशनी विजय पालव, प्राची प्रभाकर गोठणकर, दीपलक्ष्मी चंद्रकांत सावंत या कलाकारांनी उत्कृष्ट सादरीकरण केले. या एकांकिकेचे लेखन व प्रकाशयोजना श्री. राहुल संजय कदम, दिग्दर्शन श्री. सत्यवान बाळा गांवकर तर संगीतसाथ रोहित संजय कदम यांनी केले.

या एकांकिकेसाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. धनंजय तिवरेकर, प्रा. सोमकांत केळुसकर, त्याचप्रमाणे प्रा. नीलिमा रासम, प्रा. सुभाष बांबुळकर, प्रा. सरिता झेमणे, प्रा. प्रियांका चोरगे, प्रा. वैभव कदम, प्रा. प्रचिती पिळणकर यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी सुप्रसिद्ध मराठी सिने अभिनेते श्री विजय पाटकर यांनी विद्यार्थ्यांना संबोधीत करत मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

कुडाळ | देवेंद्र गावडे ( उपसंपादक ) : मुंबई विद्यापीठ युवा महोत्सव अंतर्गत नुकतेच ओरोस येथील साई कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या 'धयकालो' या एकांकिकेला यश मिळाले. यातील कलाकार प्रथमेश देसाई व सेजल शिरवणकर यांना पुरुष व स्त्री अभियानासाठी तर 'धयकालो' या एकांकिकेसाठी उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले आहे.

५६ व्या युवा महोत्सवाची कला, वाणिज्य आणि विद्यापीठ स्तरावरील अंतिम फेरी नॅशनल कॉलेज बांद्रा येथे संपन्न झाली. या अंतिम फेरीसाठी २४ संघ सहभागी होते. यात ओरोस महाविद्यालयाला उत्तेजनार्थ क्रमांक मिळाला. या एकांकिकेमध्ये महाविद्यालयाचे विद्यार्थी प्रथमेश साबाजी देसाई, सेजल संतोष शिरवंडकर, साक्षी दिगंबर तेली, दीपक मोहन कदम, ओमकार रविंद्र मालवे, रोशनी विजय पालव, प्राची प्रभाकर गोठणकर, दीपलक्ष्मी चंद्रकांत सावंत या कलाकारांनी उत्कृष्ट सादरीकरण केले. या एकांकिकेचे लेखन व प्रकाशयोजना श्री. राहुल संजय कदम, दिग्दर्शन श्री. सत्यवान बाळा गांवकर तर संगीतसाथ रोहित संजय कदम यांनी केले.

या एकांकिकेसाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. धनंजय तिवरेकर, प्रा. सोमकांत केळुसकर, त्याचप्रमाणे प्रा. नीलिमा रासम, प्रा. सुभाष बांबुळकर, प्रा. सरिता झेमणे, प्रा. प्रियांका चोरगे, प्रा. वैभव कदम, प्रा. प्रचिती पिळणकर यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी सुप्रसिद्ध मराठी सिने अभिनेते श्री विजय पाटकर यांनी विद्यार्थ्यांना संबोधीत करत मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!