आचरा | प्रसाद टोपले : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या आचरा येथील ‘इनामदार श्री देव रामेश्वर गणेशोत्सव २०२३’ निमित्त भव्य एकेरी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेतील प्रथम क्रमांकासाठी १५,०००/-*व चषक तर
व्दितीय क्रमांकासाठी रु. १०,०००/- व चषक आणि
तृतिय क्रमांकासाठी रु. ७,०००/- व चषक अशी मुख्य बक्षिसे आहेत. उत्तेजनार्थ म्हणून ३ क्रमांकांसाठी रु. २,०००/- व चषक असे बक्षीस आहे.
या स्पर्धेचे नियम खालील प्रमाणे आहेत.
१. स्पर्धा रात्री ९.३० वाजता चालू होईल.
२. तोकड्या कपड्यातील तथा अश्लील भाषेतील नृत्य चालणार नाही.
३. नृत्य ३ मिनिटांच्या वर असावे.
४. फायनलसाठी निवड झालेल्या स्पर्धकांची दुसरी फेरी घेण्यात येईल.
५. दुसऱ्या फेरीसाठी निवड झालेल्या स्पर्धकाला गाणे आयोजकांकडून देण्यात येईल.
६. मागच्या दोन वर्षातील झालेले गाणे चालणार नाही.
७. प्रथम जो स्पर्धक गाणे देईल. ते गाणे त्यांच्यासाठी लॉक करण्यात येईल. ते गाणे दुसऱ्या स्पर्धकांना घेता येणार नाही.
८. सर्व स्पर्धकांनी ९.०० वाजता वेशभूषा व रंगभूषा करून तयार रहावे.
९. नृत्य सादरीकरणाचे क्रम हे चिठ्ठीव्दारे काढण्यात येतील.
१०. चिठ्ठीमधे ज्या स्पर्धकाचे नावं येईल. त्यालाच नृत्य सादरीकरण करायचे आहॆ.
११. नाव जाहीर झाल्यावर ज्या स्पर्धकाची तयारी नसेल तर त्यांचे १० गुण कमी करण्यात येतील.
१२. स्पर्धा संपेपर्यंत सर्व स्पर्धकांना थांबणे बंधनकारक आहे. प्रायोजकाकडून प्रत्येक स्पर्धकाला स्मृतीचिन्ह स्पर्धा संपल्यावर देण्यात येणार आहे. स्पर्धक हजर नसेल, तर ते नंतर देण्यात येणार नाही.
१३. विजयी स्पर्धक बक्षिस सभारंभावेळी गैरहजर असेल. तर त्यांचा क्रमांक रद्द करून दुसऱ्या स्पर्धकाला देण्यात येईल.
१४. स्पर्धेचे नियम बदलण्याचा अधिकार आयोजकांकडे असेल.
१५. स्पर्धेचा अंतिम निर्णय परिक्षक व आयोजकांकडे राहिल.
१६. स्पर्धकांना परीक्षणा संबंधी काही प्रश्न असतील. तर स्पर्धा झाल्यावर परीक्षकांना भेटून त्यांचे निरसन करावे. नंतर परिक्षक किंवा आयोजकांना फोन करून त्रास देऊ नये.
अधिक माहिती साठी खालील क्रमांकांवर संपर्क साधायचे आवाहन करण्यात आले आहे.
विजय ( बाबू ) कदम ; ९४२१०३७७१२ / ९४२१५७४७०० , तेजस्विता केळुसकर – ९४०४४५७८३४
व अनिकेत घाडी : ८५५१००३७०७.