26.4 C
Mālvan
Tuesday, September 17, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

लिफ्ट कोसळून ७ जणांचा मृत्यू..!

- Advertisement -
- Advertisement -

सातही जण छताचे वाॅटरप्रुफींग करणारे कामगार असल्याची प्राथमिक माहिती.

ठाणे | ब्युरो न्यूज : ठाण्यात अंडरग्राउंड लिफ्ट कोसळून भीषण दुर्घटना घडली आहे. या घटनेत ७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांकडून समजते आहे. रुणवाल गार्डन इथे ही घटना आज सायंकाळी घडली. घटनेनंतर पोलीस आणि बचावपथकाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

ठाणे पश्चिम याथील रुणवाल गार्डनमध्ये अंडरग्राउंड लिफ्ट कोसळल्याची घटना घडलीय. या दुर्घटनेत सात जण मृत्युमुखी पडले असल्याची माहिती समजते. लिफ्टमध्ये एकूण ८ जण होते, त्यापैकी ७ जणांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. ठाण्याच्या ‘बाळकुम’ परिसरात असलेल्या ‘रुणवाल आयरीन’ या ४० मजली इमारतीवरून लिफ्ट कोसळून सात कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. नुकतेच बांधकाम पूर्ण झालेल्या या इमारतीच्या छतावर वॉटरप्रूफिंग चे काम सुरू होते. हे काम संपवून कामगार खाली येत असताना हा अपघात घडला.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

सातही जण छताचे वाॅटरप्रुफींग करणारे कामगार असल्याची प्राथमिक माहिती.

ठाणे | ब्युरो न्यूज : ठाण्यात अंडरग्राउंड लिफ्ट कोसळून भीषण दुर्घटना घडली आहे. या घटनेत ७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांकडून समजते आहे. रुणवाल गार्डन इथे ही घटना आज सायंकाळी घडली. घटनेनंतर पोलीस आणि बचावपथकाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

ठाणे पश्चिम याथील रुणवाल गार्डनमध्ये अंडरग्राउंड लिफ्ट कोसळल्याची घटना घडलीय. या दुर्घटनेत सात जण मृत्युमुखी पडले असल्याची माहिती समजते. लिफ्टमध्ये एकूण ८ जण होते, त्यापैकी ७ जणांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. ठाण्याच्या 'बाळकुम' परिसरात असलेल्या 'रुणवाल आयरीन' या ४० मजली इमारतीवरून लिफ्ट कोसळून सात कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. नुकतेच बांधकाम पूर्ण झालेल्या या इमारतीच्या छतावर वॉटरप्रूफिंग चे काम सुरू होते. हे काम संपवून कामगार खाली येत असताना हा अपघात घडला.

error: Content is protected !!