29.6 C
Mālvan
Tuesday, May 6, 2025
IMG-20250501-WA0008
IMG-20240531-WA0007

तंत्रस्नेही शिक्षक सतिश मुणगेकर अण्णा भाऊ साठे समाजभूषण पुरस्काराने सन्मानित ; कोल्हापूरातील दसरा चौकातल्या शाहू स्मारक भवनात संपन्न झाला दिमाखदार सोहळा.

- Advertisement -
- Advertisement -

मसुरे | प्रतिनिधी : सत्यशोधक अण्णा भाऊ साठे साहित्य विचार व संशोधन परिषद महाराष्ट्र या संस्थेमार्फत दिला जाणारा २०२३ या वर्षाचा सत्यशोधक अण्णा भाऊ साठे समाजभूषण पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील मुणगे गावचे सुपुत्र व रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील आदर्श केंद्र शाळा चिखली क्र.१ या शाळेतील पदवीधर विषय शिक्षक आणि तंत्रस्नेही शिक्षक श्री.सतिश पांडुरंग मुणगेकर यांना प्रदान करण्यात आला. शाहू स्मारक भवन दसरा चौक कोल्हापूर येथे मोठा दिमाखदार सोहळा पार पडला. सदर कार्यक्रमाला बळवंतराव माने ज्येष्ठ आंबेडकरवादी नेते, प्रा,डॉ .गिरीश मोरे अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याचे अभ्यासक व विचारवंत, प्रा,डॉ.अर्चना जगतकर चेअरमन समाजशास्त्र आभ्यास मंडळ शिवाजी विद्यापिठ कोल्हापूर , श्री.अनिल म्हमाने प्रकाशक कोल्हापूर तसेच संशोधन परिषदेचे अध्यक्ष प्रा.अमोल महापुरे. सचिव प्रा.बबन पाटोळे, कार्याध्यक्ष श्री,विश्वनाथ तराळ, प्रा,निलोफर मुजावर असे मान्यवर उपस्थित होते.

सतिश मुणगेकर हे निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र राज्य या मंडळाचे रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष तसेच आविष्कार फाऊंडेशन इंडिया या संस्थेचे गुहागर तालुक्याचे तालुकाध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. कोकण विभागातील शैक्षणिक व सामाजिक स्तरातून श्री सतिश मुणगेकर यांची प्रशंसा होत आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मसुरे | प्रतिनिधी : सत्यशोधक अण्णा भाऊ साठे साहित्य विचार व संशोधन परिषद महाराष्ट्र या संस्थेमार्फत दिला जाणारा २०२३ या वर्षाचा सत्यशोधक अण्णा भाऊ साठे समाजभूषण पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील मुणगे गावचे सुपुत्र व रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील आदर्श केंद्र शाळा चिखली क्र.१ या शाळेतील पदवीधर विषय शिक्षक आणि तंत्रस्नेही शिक्षक श्री.सतिश पांडुरंग मुणगेकर यांना प्रदान करण्यात आला. शाहू स्मारक भवन दसरा चौक कोल्हापूर येथे मोठा दिमाखदार सोहळा पार पडला. सदर कार्यक्रमाला बळवंतराव माने ज्येष्ठ आंबेडकरवादी नेते, प्रा,डॉ .गिरीश मोरे अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याचे अभ्यासक व विचारवंत, प्रा,डॉ.अर्चना जगतकर चेअरमन समाजशास्त्र आभ्यास मंडळ शिवाजी विद्यापिठ कोल्हापूर , श्री.अनिल म्हमाने प्रकाशक कोल्हापूर तसेच संशोधन परिषदेचे अध्यक्ष प्रा.अमोल महापुरे. सचिव प्रा.बबन पाटोळे, कार्याध्यक्ष श्री,विश्वनाथ तराळ, प्रा,निलोफर मुजावर असे मान्यवर उपस्थित होते.

सतिश मुणगेकर हे निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र राज्य या मंडळाचे रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष तसेच आविष्कार फाऊंडेशन इंडिया या संस्थेचे गुहागर तालुक्याचे तालुकाध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. कोकण विभागातील शैक्षणिक व सामाजिक स्तरातून श्री सतिश मुणगेकर यांची प्रशंसा होत आहे.

error: Content is protected !!