स्पर्धेच्या नवव्या वर्षीही उपस्थितांनी अनुभवली ‘नव्याची नवलाई..!’
संकल्पक सौ. शिल्पा यतीन खोत यांनी स्पर्धकांत मिसळून दिले प्रोत्साहन.
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या नारळी पौर्णिमा उत्सवनिमित्त सौ. शिल्पा यतीन खोत या सुप्रसिद्ध सामाजिक मित्रमंडळातर्फे आयोजित जिल्हास्तरीय ‘महिलांची नारळ लढविणे’ स्पर्धा मालवण नवीन बंदर धक्का तथा बंदरजेटी येथे दिमाखात संपन्न झाली. यंदा या भव्य स्पर्धेचे नववे वर्ष होते आणि तरी या स्पर्धेची नवलाई आणखीन नवीन भासली असल्याची प्रतिक्रिया उपस्थित प्रेक्षक, स्पर्धक, मान्यवर व मालवण तसेच जिल्हा वासियांनी दिली. या स्पर्धेचे उदघाटन आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार वैभव नाईक यांनी या स्पर्धेला तसेच सौ. शिल्पा यतीन खोत मंडळ व सौ. शिल्पा यतीन खोत व माजी नगरसेवक व माजी बांधकाम सभापती यतीन खोत यांना व मालवण वासियांना शुभेच्छा दिल्या.

पारंपारिक सुसंस्कृतपणाला आधुनीक प्रगतीच्या दृष्टीने पाहून विविध समाजोपयोगी व सांस्कृतिक उपीक्रम कार्यक्रम राबविणार्या या मंडळाच्या सर्वेसर्वा संकल्पक सौ. शिल्पा यतीन खोत यांनी या स्पर्धेमार्फत महिलांमधील आदरणीय माता, भगिनी व प्रसंगी रणरागिणी तिची अमर्याद शक्ती कशी दाखवू शकते यासाठी ह्या मंचाद्वारे नेहमीच प्रयत्न केला जाईल असे सांगितले. स्वराज्य महिला ढोल पथकाचे सुनियोजीत संचलन व कोंबडा तसेच श्री वीर बजरंगबली हनुमान यांच्या वेशभूषेतील वावरणारे कलावंत हे सुद्धा या संपूर्ण उपक्रमा दरम्यान आकर्षण ठरले.

सौ. शिल्पा यतीन खोत यांनी स्वतः स्पर्धकांमध्ये मिसळत त्यांची ओळख करुन घेणे व प्रोत्साहन देण्याचे मोलाचे काम केल्याने स्पर्धकांचा हुरूप आणखीन वाढला अशी प्रतिक्रिया उपस्थित सहभागी महिला स्पर्धकांनी दिली. सौ. शिल्पा यतीन खोत यांची कन्या कु. तनिष्का ही अतिशय सामान्य स्वयंसेवकाप्रमाणे स्वराज्य ढोल पथकात समाविष्ट होऊन संचलन करत होती हा साधेपणा उपस्थित सर्वांमध्ये कौतुकाचा विषय ठरला.


या स्पर्धेला शिवसेना ठाकरे गटाचे नेते संदेश पारकर, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख व माजी जि प सदस्य हरी खोबरेकर, शहरप्रमुख व मच्छिमार नेते बाबी जोगी, माजी नगरसेवक व माजी बांधकाम सभापती मंदार केणी, कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघ युवती सेना अधिकारी सौ. शिल्पा खोत, माजी नगरसेवक व माजी बांधकाम सभापती यतीन खोत, माजी नगरसेवक महेश जावकर, युवा सेनेचे मंदार ओरसकर, दीपा शिंदे व इतर उपस्थित होते. यावेळी आमदार वैभव नाईक यांनी सौ शिल्पा खोत तसेच श्री. यतीन खोत यांच्या सामाजिक कार्याची विशेष प्रशंसा केली.


या स्पर्धेच्या मानकरी नंदिनी परब ठरल्या. मानाचा सोन्या-चांदीचा नारळ, सोन्याचा कॉईन, सोन्याची नथ यांनी मढवलेली दिमाखदार ट्रॉफी मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेच्या महाविजेत्या नंदिनी परब यांना सुपूर्द करण्यात आली.स्पर्धेत कस्तुरी राऊळ या उपविजेत्या ठरल्या. त्यांना सोन्याचा कॉइन, सोन्याची नथ यांनी मढवलेली ट्रॉफी तसेच तृतीय क्रमांक प्राप्त भार्वी शिर्सेकर व चतुर्थ क्रमांक प्राप्त रोसेस लुद्रीक यांना सोन्याची नथ देऊन मान्यवर व आयोजक टीमच्या वतीने सन्मानित करण्यात आले. यासह स्पर्धेच्या शेवटच्या फेरीत पोहचलेल्या दहा स्पर्धकांना चांदीची नाणी देत सन्मानित करण्यात आले. तसेच आयसीआयसीआय प्रुडेनशीयल व शिल्पा खोत मित्रमंडळ वतीने लकी ड्रॉ स्वरूपात वीस जणांना गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती उद्योजक राजन आंगणे, उमेश नेरुरकर, अमेय पै,जॉन रोना, परशुराम पाटकर, देवदत्त हडकर, डॉ. शिल्पा झाटये, एपीआय सुप्रिया बंगडे, तृप्ती मयेकर, दर्शना कासवकर, वैशाली शंकरदास, स्मृती कांदळकर, गीतांजली आचरेकर, अनुष्का चव्हाण, सिया धुरी, श्रद्धा वेंगुर्लेकर, मेघना कांबळी, निकिता बागवे, सुहास वालावलकर, बंड्या सरमळकर, सचिन ओटवणेकर, प्रतिभा चव्हाण, नंदा सारंग, रूपा कुडाळकर, काँग्रेस पदाधिकारी बाळू अंधारी, पल्लवी तरी, काँग्रेस जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी, वेंगुर्ला येथील सरपंच सुमेधा तेंडुलकर, अभय कदम, उमेश चव्हाण, प्रवीण रेवणकर, बाबा मडये, करण खडपे, यशवंत गावकर, हेमंत मोंडकर, अंकिता मयेकर, मनस्वी कदम, वझे काकी, चारुशीला आढाव, शांती तोंडवळकर, निनाक्षी शिंदे, दिव्या परब, अनुष्का चव्हाण, गीता आचरेकर, भारती आडकर, अनंत पाटकर, दिलीप पवार, अमन आणि यांसह मालवणी स्वरांचा बादशाहा निवेदक बादल चौधरी, अक्षय सातार्डेकर यासह अनेक मान्यवर, सहकारी मित्रपरिवार बहुसंख्येने उपस्थित होते.
महिला व युवतींचा भरभरून सहभाग असलेल्या या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्व मान्यवर, स्वयंसेवक, स्वयंसेविका यांचे सौ.शिल्पा यतीन खोत व श्री. यतीन परशुराम खोत यांनी विनम्र आभार मानले आणि दरवर्षी आणखीन नाविन्यपूर्ण पद्धतीने आपण हा समाज सांस्कृतिक उपक्रम राबवत राहून सामाजिक आनंदाचा टक्का वाढवत रहायला हातभार लावतच राहू असे सांगितले.