24.9 C
Mālvan
Friday, September 20, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

फळ फूल व भाजी विक्रेत्यांची कसून चौकशी व्हावी अशी भाजपा आमदार नितेश राणेंची पोलिसांकडे मागणी ; भाजप कार्यकर्त्यांसह दिले निवेदन

- Advertisement -
- Advertisement -

पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करा असा संदेश देणार्या युवतीच्या मागील मास्टरमाईंड कोण याचा छडा लावणे आवश्यक असल्याचे दिले निवेदन ; हिंदू देव देवतांची विटंबना सहन करणार नसल्याचे केले नमूद.

पोलिसांच्या कारवाईवर लक्ष ठेवून आहोतच परंतु भारतीय देशभक्त म्हणून जर कायदा हातात घ्यावा लागला तर कायदा सुव्यवस्थेची चिंता करावी असाही दिला इशारा.

कणकवली | प्रतिनिधी : आमदार नितेश राणे यांच्या प्रमुखत्वाखाली भाजपा कार्यकर्त्यांनी कणकवली पोलीस निरीक्षक अमित यादव यांची भेट घेतली. एका युवतीने पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करा आणि हिंदू देव देवतांची विटंबना करणारी पोस्ट इंस्टाग्रामवर टाकल्याबद्दल भाजपाने आक्रमक भूमिका घेतली. या पार्श्वभूमीवर तातडीने आमदार नितेश आणि भाजपा पदाधिकाऱ्यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दाखल होत, पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्याशी चर्चा करत संबंधित युवतीवर व कणकवली शहरात असलेल्या परप्रांतीय फळ, फूल , भाजी विक्रेते यांची कसून चौकशी करावी अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी केली आहे. त्यावर पोलीस पोलीस निरीक्षकांनी तत्काळ कारवाईचे आश्वासन दिले.

यावेळी भाजपा उपाध्यक्ष गोट्या सावंत, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, शहराध्यक्ष अण्णा कोदे, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, बँक संचालक प्रज्ञा ढवण, समीर सावंत, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, उपसरपंच स्वप्निल चिंदरकर, साकेडी उपसरपंच प्रज्वल वर्दम, सोशल मीडिया प्रमुख समीर प्रभूगांवकर, निखिल आचरेकर आदी भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटल्याप्रमाणे वाॅटस् ॲप वर व्हायरल होत असलेल्या आक्षेपार्ह पोस्टबद्दल तक्रार करण्यात आली. कणकवली तालुक्यातील मौजे कलमठ जलाराम सॉमिलच्या मागे येथील एका युवतीने १४ ऑगस्ट, २०२३ रोजी पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी अति आनंद करणारी व त्यानिमित्त स्वातंत्र्यदिन उत्साहाने साजरा करा, अशा प्रकारचा आक्षेपार्ह पोस्ट सोशल मिडीयाच्या माध्यमातून व्हायरल केला होता. तसेच समस्त हिंदू धर्माचे आदरस्थान असलेल्या हिंदू देव देवतांबद्दल आक्षेपार्ह स्टेटस सोशल मिडियाच्या माध्यमातून व्हायरल केली होती. जाणीवपूर्वक हिंदू धर्मीयांच्या भावना दुखवण्याचा व दोन गटामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्याने भारताचा स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट, २०२३ रोजी आहे हे माहित असताना देखील जाणून बुजून जिल्ह्यातील वातावरण बिघडविण्याकरिता पाकिस्तान स्वातंत्र्य दिनाची पोस्ट व्हायरल केली. हिंदू देव देवतांची विटंबना कधीही सहन केली जाणार नसल्याचेही निवेदनात नमूद केले आहे. देशाच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करत असताना केलेले कृत्य योग्य नाही. त्यामुळे तिने केलेले कृत्य धार्मिक तेढ निर्माण करणारे व देशाच्या सार्वभौमत्वाला बाधा निर्माण करणारे आहे. तरी अशा अपप्रवृत्तीला वेळीच आळा घालण्यासाठी आपण तात्काळ कठोर कारवाई करावी, अशी मागणी भाजपा पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

दरम्यान या एकंदरीत प्रकारानंतर आमदार नितेश राणे यांनी पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, अशा प्रकारची घटना ही सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली आहे. पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिवस साजरा करणारी पोस्ट एका युवतीने सोशल मीडियावर केली. तसेच स्वामी समर्थांच्या फोटोवर घाणेरडी टीका करणे, अशा प्रकारची वृत्ती कणकवलीत जन्माला आलेली आहे. पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिवस तसेच हिंदूंच्या देवी देवतांची टिंगल उडवत असतील. तर पोलिसांनी पाऊल उचलावे पण देशावर प्रेम करणारे नागरिक, देशभक्त म्हणून आम्हाला कायदा हातात घ्यावा लागला तर मग पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेची चिंता करावी, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. त्यामुळे पोलिसांनी त्या युवतीला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावून घेऊन चौकशी सुरू केली आहे. काही महिन्यापासून कणकवली शहरात भाजी विक्रेत्ये, फळ विक्रेत्ये असो यांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे त्यांची पुरेपूर पुरेशी माहिती आपल्याजवळ नाही आहे. त्यामुळे ते याठिकाणी का आणि कशाला आले आहेत ? त्यांना येथे नेमकं कोण आणतं ? याचा तपास पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून झाला पाहिजे अशी आम्ही पोलिसांकडे मागणी केली आहे असेही ते म्हणाले. २६/११ चा हल्ला देखील असाच सागरी मार्गाने झालेला आहे. दरम्यान असेही फळ, फूल, भाजीसह छोट मोठे विक्रेते येतात आणि हळूहळू त्या जिल्ह्यात शांतता भंग कसा करायचा तेथील कायदा व सुव्यवस्था भंग कसा करायचा असे प्रकार घडवतात मात्र याच्या मागचा मास्टर माईंड नेमका कोण आहे हे तपासणे गरजेचे आहे. तसेच पोलीस तपासात नेमके काय उघड होत ते पाहू आणि लागलीच आमची भूमिका स्पष्ट करू असेही त्यांनी सांगितले.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!