
वैभववाडी | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातल्या सडूरे – शिराळे येथील ग्रा. पं. सदस्य सामाजिक कार्यकर्ते श्री नवलराज काळे यांच्या वाढदिवस शैक्षणिक उपक्रमाने साजरा करण्यात आला. श्री माऊली चॅरिटेबल ट्रस्ट सिंधुदुर्ग व सडूरे – शिराळे विकास मंच च्या वतीने सडूरे शिराळे ग्रामपंचायत हद्दीतील सर्व शाळेतल्या प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटपचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी काळे यांचा सरपंच ग्रामसेवक उपसरपंच सदस्य शाळा शिक्षक विद्यार्थी व गावातील ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. उपस्थित सडुरे केंद्र शाळा नंबर एक , जिल्हा परिषद शाळा शिराळे, जिल्हा परिषद शाळा तांबळघाटी मधील सर्व विद्यार्थ्यांना व सडुरे शिराळे अंगणवाडी येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

यावेळी ग्रामपंचायत सरपंच दीपक चव्हाण उपसरपंच आनंदा जंगम, ग्रामपंचायत सदस्य विलास जंगम, ग्रामपंचायत सदस्या रोशनी बाणे, प्रियंका पाटील, विशाखा काळे, माजी ग्रामपंचायत सदस्य आकांक्षा जंगम, तंटा मुक्ती अध्यक्ष विठ्ठल काटे, भाजपा शिराळे बूथ अध्यक्ष विजय पाटील, मुख्याध्यापक श्री कुवर सर, शिक्षिका खांबल मॅडम, शिराळे मुख्याध्यापक विनोद करपे सर, शिक्षक स्वप्निल गुरखे सर, केळकर मॅडम, तांबळघाटी शाळा मुख्याध्यापक भैराळे सर,परशुराम डांगे, प्रभाकर पाटील, हिरावती पाटील, दीपक पाटील, प्रकाश पाटील, जयेंद्र बोडेकर, अनिल पाटील,रामचंद्र उर्फ शाहू बोडेकर, बाळकृष्ण बोडेकर, सविता बोडेकर, वेदिका विजय बोडेकर, संदीप धामणे,नामदेव पाटील,अक्षय पाटील,कमलेश धामणे, परशुराम पाटील,भगवान बोडेकर, ग्रामपंचायत कर्मचारी सुनील राऊत, कोतवाल मोहन जंगम,पाणी कर्मचारी अशोक पाटील, प्रभाकर राणे,रोजगार सेवक सागर मेजारी, अंगणवाडी सेविका जागृती रावराणे, सौ जंगम व तिन्ही प्रशालेचे विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


२५ ऑगस्टला प्राथमिक शाळा क्र. १ मध्ये सर्व ग्रामपंचायत कमिटीच्या उपस्थितीत शैक्षणिक साहित्य वाटप व खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न झाला तर २६ ऑगस्टला रोजी शाळा शिराळे व तांबळघाटी या दोन शाळेमध्ये कार्यक्रम संपन्न झाले. तर चव्हाणवाडी येथील सोमवारी सकाळी होणार आहे. तरी तालुक्यातील इतर काही शाळेत देखील पुढील काही दिवस हा उपक्रम चालू ठेवण्याचा मानस चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष नवलराज काळे यांचा आहे. उपस्थित राहून सर्व ग्रामस्थांनी नवलराज काळे यांना शुभेच्छा दिल्याबद्दल काळे त्यांनी सर्वांच्या आभार मानले आहेत.