मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगर वाचन मंदिर, मालवण तर्फे आयोजित सौ. विंदा रामकृष्ण जोशी स्मृती वक्तृत्व स्पर्धेत तालुकास्तरीय गटात पार्श्व प्रदीप सामंत याने तर जिल्हास्तरीय गटात मुग्धा समीर गवाणकर हिने प्रथम क्रमांक पटकावला.

नगर वाचन मंदिरच्या सभागृहात ही स्पर्धा संपन्न झाली. यावेळी प्रारंभी ज्येष्ठ रानकवी ना. धो. महानोर व ज्येष्ठ साहित्यिक शिरीष कणेकर यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. प्रास्ताविक ग्रंथपाल संजय शिंदे यानी केले. तर स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे कार्यवाह प्रा. नागेश कदम, परिक्षक सेवानिवृत्त शिक्षक विनायक कोळंबकर व ऍड. पलाश चव्हाण यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि सौ. विंदा जोशी व श्री देवी सरस्वती यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले.

या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तालुकास्तरीय स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे : प्रथम- क्रमांक पार्श्व प्रदिप सामंत, व्दितीय- अस्मि अशोक आठलेकर, तृतीय- सोहम समीर गवाणकर, उत्तेजनार्थ प्रथम- स्वरा रूपेश बांदेकर, उत्तेजनार्थ द्वितीय – रुचा रामचंद्र चव्हाण.
जिल्हास्तरीय स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे- प्रथम- मुग्धा समीर गवाणकर, व्दितीय- दिया दत्तात्रय गोलतकर, तृतीय- रोशन कैलास साळुंखे, उत्तेजनार्थ प्रथम- सई बलराम सामंत, उत्तेजनार्थ व्दितीय- सौरवी गंगाराम देसूरकर.
दोन्ही गटातील विजेत्या तीन स्पर्धकांना आकर्षक पारितोषिके व प्रशस्तीपत्रके देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला देणगीदार रामकृष्ण जोशी, शिक्षक, पालक, विद्यार्थी- विद्यार्थिनी, नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन श्रेया चव्हाण यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रतिभा पेडणेकर व रमाकांत जाधव यांनी परिश्रम घेतले.
अभिनंदन