मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या ग्रामपंचायत वरची गुरामवाडीच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव समारोपा निमित्त माजी सैनिक श्री विद्याधर रेवणकर, माजी सैनिक श्री. सुभाष गुराम तसेच स्वातंत्र्य सैनिक बापूभाई शिरोडकर यांचे नातेवाईक कुटुंबीय श्री किशोर शिरोडकर यांचा सत्कार करण्यात आला. सरपंच श्री.शेखर पेणकर, उपसरपंच श्री धोंडी गोविंद कामतेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष श्री सुनील गुराम, माजी तंटामुक्ती अध्यक्ष श्री. सुनील नाईक, ग्रामपंचायत सदस्य श्री. प्रशांत टेंबुलकर, वंदेश ढोलम, विलास बांदेकर, ग्रामपंचायत सदस्य मयुरी कुबल, संपदा वालावलकर, विद्या गिरकर, सुप्रिया गुराम, श्रद्धा गुराम, ग्रामस्थ श्री. बाळ महाभोज, माजी जि.प.सदस्य व माजी उपसरपंच श्री ऋषी पेणकर, श्री सुभाष तळावडेकर, श्री. प्रितम खटावकर, श्री. पराग माळवदे, अनिल ढोलम, विनीत भोजणे, श्री.नंदु वालावलकर, श्री.अवदुत डगरे, ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. श्री सुनिल नाईक व श्री प्रशांत टेंबुलकर तसेच मुख्याध्यापक श्री.ठाकुर यांनी यावेळी मनोगत विचार मांडले. श्री. विद्याधर रेवंडकर यांनी आपले सेवेतील अनुभव कथन केले.
स्वागत प्रास्ताविक ग्रामसेवक श्री. लक्ष्मण सरमळकर यांनी केले तर आभार सरपंच शेखर पेणकर यांनी मानले.