23.7 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

मालवणच्या सिंधुदुर्ग महाविद्यालयाचा एनसीसी कॅडेट चंदन कोळेकर याची ‘महाराष्ट्र सिक्युरीटी फोर्स’ मध्ये झाली निवड.

- Advertisement -
- Advertisement -

महाविद्यालयातील एनसीसी विभागाचा आलेख चढता असल्याने प्राचार्यांनी व्यक्त केले समाधान.

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचा एनसीसी कॅडेट चंदन कोळेकर याची ‘महाराष्ट्र सिक्युरीटी फोर्स’ मध्ये निवड झाली आहे. या प्रशिक्षणाला तो रवाना झाला आहे. केवळ इयत्ता १२ वी मध्ये शिकताना कष्टाळूपणाने त्याने अभ्यास सांभाळत यासाठी लेखी व शारिरीक परीक्षा देत त्याची नियुक्ती झाल्याने त्याची महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक व इतर सर्वांनीच त्याची विशेष प्रशंसा केली आहे. अतिशय सामान्य परिस्थितीतून शिक्षण घेताना त्याने एनसीसी मध्ये प्रवेश घेत त्याने त्याचे लक्ष ‘संपूर्ण करीअर व भरतीवर’ केंद्रीत केले होते असे त्याच्या प्राध्यापक व प्राचार्य यांनी स्पष्ट केले आहे. महाविद्यालयातील एन. सी. सी. विभागाचे प्रमुख असोसिएट ऑफिसर कॅप्टन एम. आर. खोत यांचे त्याला मार्गदर्शन लाभले.

कृ. षी. देसाई शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष बाळासाहेब पंत वालावलकर, सचिव गणेश कुशे, प्राचार्य शिवराम ठाकूर, प्राध्यापक वर्ग तसेच सर्व एन. सी. सी. कॅडेटस नी अभिनंदन केले आहे. महाविद्यालयातील एनसीसी विभागाचा आलेख चढता असल्याने प्राचार्यांनी समाधान व्यक्त केले आहे. सिंधुदुर्ग महाविद्यालयाला पोलिस व संरक्षण दलातील माजी विद्यार्थी व विद्यार्थिनींचा एक वेगळा वारसा आहे तोच वारसा आता आणखीन जास्त संख्येने वाढत राहील अशी प्रतिक्रिया अनेक माजी विद्यार्थी विद्यार्थिनींनी दिली आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

महाविद्यालयातील एनसीसी विभागाचा आलेख चढता असल्याने प्राचार्यांनी व्यक्त केले समाधान.

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचा एनसीसी कॅडेट चंदन कोळेकर याची 'महाराष्ट्र सिक्युरीटी फोर्स' मध्ये निवड झाली आहे. या प्रशिक्षणाला तो रवाना झाला आहे. केवळ इयत्ता १२ वी मध्ये शिकताना कष्टाळूपणाने त्याने अभ्यास सांभाळत यासाठी लेखी व शारिरीक परीक्षा देत त्याची नियुक्ती झाल्याने त्याची महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक व इतर सर्वांनीच त्याची विशेष प्रशंसा केली आहे. अतिशय सामान्य परिस्थितीतून शिक्षण घेताना त्याने एनसीसी मध्ये प्रवेश घेत त्याने त्याचे लक्ष 'संपूर्ण करीअर व भरतीवर' केंद्रीत केले होते असे त्याच्या प्राध्यापक व प्राचार्य यांनी स्पष्ट केले आहे. महाविद्यालयातील एन. सी. सी. विभागाचे प्रमुख असोसिएट ऑफिसर कॅप्टन एम. आर. खोत यांचे त्याला मार्गदर्शन लाभले.

कृ. षी. देसाई शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष बाळासाहेब पंत वालावलकर, सचिव गणेश कुशे, प्राचार्य शिवराम ठाकूर, प्राध्यापक वर्ग तसेच सर्व एन. सी. सी. कॅडेटस नी अभिनंदन केले आहे. महाविद्यालयातील एनसीसी विभागाचा आलेख चढता असल्याने प्राचार्यांनी समाधान व्यक्त केले आहे. सिंधुदुर्ग महाविद्यालयाला पोलिस व संरक्षण दलातील माजी विद्यार्थी व विद्यार्थिनींचा एक वेगळा वारसा आहे तोच वारसा आता आणखीन जास्त संख्येने वाढत राहील अशी प्रतिक्रिया अनेक माजी विद्यार्थी विद्यार्थिनींनी दिली आहे.

error: Content is protected !!