कणकवली | गणेश चव्हाण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘कणकवली नाभिक’ संघटनेने नुकत्याच घडलेल्या चिपळूण ओमळी येथील दुर्दैवी घटनेतील नाभिक समाजाची युवती निलीमा सुधाकर चव्हाण हिचा अमानुष पणे खून करणार्या नराधमाला तत्काळ शोधुन त्याला कठोर शिक्षा करावी यासाठी आणि घडलेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी कणकवलीचे पोलीस निरीक्षक सचिन हिंदोळकर यांना निवेदन दिले.

कामावरुन गावी येत असताना अचानक बेपत्ता झालेल्या निलीमा चव्हाण हिचा मृतदेह दाभोळ येथील खाडीत सापडला. तपास यंत्रणेने लवकरात लवकर तपास करुन दोषींना कठोर शासन करावे व अन्यायग्रस्त चव्हाण कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा यासाठी कणकवली पोलीस निरीक्षक यांना लेखी निवेदन देण्यात आले. पोलिस निरीक्षक सचिन हिंदोळकर यांनी पुढील चौकशी करण्यासाठी तातडीने नाभिक महिलांचे निवेदन पुढे पाठवत असल्याचे आश्वासन दिले.
यावेळी नाभिक संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर , जिल्हा कार्याध्यक्ष चंद्रशेखर चव्हाण, तालुकाध्यक्ष रोशन चव्हाण, महिला तालुकाध्यक्षा सौ. तेजस्विनी कुबल, उपाध्यक्ष निलेश चव्हाण, युवा तालुकाध्यक्ष रुपेश चव्हाण, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पत्रकार गणेश चव्हाण, जेष्ठ नाभिक कार्यकर्ते दिगंबर चव्हाण, सुभाष चव्हाण, अनंत चव्हाण, महिला सचिव आरती चव्हाण, कार्याध्यक्ष संजय कुबल, शहराध्यक्ष अनिल शिंदे, जिल्हा खजिनदार शिवानी चव्हाण, अस्मिता अणावकर, ज्योती टिपुगडे, चंदा चव्हाण, मैथिली चव्हाण, संजय चव्हाण, शरद लाड , प्रणय चव्हाण आणि ४० पेक्षा अधिक नाभिक बंधु-भगिनी उपस्थित होते. सर्वांनी अत्याचारित निलीमा सुधाकर चव्हाण हिला या दरम्यान श्रद्धांजली वाहिली.