29.1 C
Mālvan
Thursday, May 8, 2025
IMG-20240531-WA0007

मुख्यमंत्र्यांच्या महाराष्ट्रव्यापी दौऱ्याचा ठाण्यामधून शुभारंभ : नरेश म्हस्के.

- Advertisement -
- Advertisement -

मुंबई | ब्युरो न्यूज : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत संपूर्ण महाराष्ट्रभर लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, शिवसैनिक यांचे मेळावे आगामी काळात होणार आहेत. या महाराष्ट्रव्यापी दौऱ्याची सुरुवात ठाण्यातून होणार असून, यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, शिवसैनिक यांना मार्गदर्शन करणार आहेत. हा मेळावा गुरुवारी १३ जुलैला सायंकाळी ६ वाजता ‘टिप-टॉप प्लाझा, तीन हात नाका, ठाणे’ येथे संपन्न होणार आहे अशी माहिती शिवसेना जिल्हा प्रमुख, प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी यावेळी दिली.

संपूर्ण महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, शिवसैनिक यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क साधून शिवसेना मुख्यनेते . मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या मेळाव्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्या टप्प्यात पुणे, कोल्हापूर, नवी मुंबई येथे मेळावे घेणार आहेत.

या महाराष्ट्रव्यापी दौऱ्याची सुरुवात शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातून होणार आहे, गुरुवार दि.13/07/2023 रोजी टिप-टॉप प्लाझा येथे होणाऱ्या मेळाव्यासाठी ठाण्यातील सर्व पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना आणि समस्त शिवसैनिकांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना जिल्हा प्रमुख, प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मुंबई | ब्युरो न्यूज : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत संपूर्ण महाराष्ट्रभर लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, शिवसैनिक यांचे मेळावे आगामी काळात होणार आहेत. या महाराष्ट्रव्यापी दौऱ्याची सुरुवात ठाण्यातून होणार असून, यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, शिवसैनिक यांना मार्गदर्शन करणार आहेत. हा मेळावा गुरुवारी १३ जुलैला सायंकाळी ६ वाजता 'टिप-टॉप प्लाझा, तीन हात नाका, ठाणे' येथे संपन्न होणार आहे अशी माहिती शिवसेना जिल्हा प्रमुख, प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी यावेळी दिली.

संपूर्ण महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, शिवसैनिक यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क साधून शिवसेना मुख्यनेते . मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या मेळाव्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्या टप्प्यात पुणे, कोल्हापूर, नवी मुंबई येथे मेळावे घेणार आहेत.

या महाराष्ट्रव्यापी दौऱ्याची सुरुवात शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातून होणार आहे, गुरुवार दि.13/07/2023 रोजी टिप-टॉप प्लाझा येथे होणाऱ्या मेळाव्यासाठी ठाण्यातील सर्व पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना आणि समस्त शिवसैनिकांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना जिल्हा प्रमुख, प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केले आहे.

error: Content is protected !!