25.6 C
Mālvan
Friday, September 20, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

भाजपा शहर प्रभारी विजय केनवडेकर यांनी मालवण भाजपा तर्फे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना दिले लेखी निवेदन.

- Advertisement -
- Advertisement -

भुयारी गटार योजनेतील ठेकेदाराची चौकशी व्हावी व त्याला काळ्या यादीत टाकण्याची केली मागणी.

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण भाजपा शहर प्रभारी विजय केनवडेकर यांनी मालवण शहरातील भुयारी गटार योजनेबाबत पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना लेखी निवेदन दिले आहे. शहर प्रभारी विजय केनवडेकर यांनी त्यांच्या निवेदनात म्हणले की केंद्र शासनाकडील ‘UIDSSMT’ योजनेतून मालवण नगर परिषदेच्या भुयारी गटार योजना व सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प तेरा वर्षे होऊनही पूर्ण होऊ शकला नाही . यासंबंधी मालवण शहराला आवश्यक असणारी ही भुयारी गटार योजना होणे आवश्यक आहे व या उद्देशाने २६ ऑगस्ट २००९ ला सुरु झालेली ही योजना अजूनही पूर्ण होऊ शकली नाही आहे. या कामांमध्ये ठेकेदाराकडून होणारी दिरगाई कामाचं नसणारे नियोजन यामुळेच योजना मार्गस्थ होत नाही. प्रकल्पाच्या ८५% रक्कम अदा करूनही ठेकेदार काम करू शकला नाही तरिही या ठेकेदारावर कोणत्याही प्रकारची प्रशासकीय चौकशी न होता याच्यावर काम विलंबासाठी दंडात्मक कारवाई एकदाही झालेली नाही . श्री. व्ही. आर. घुगे, औरंगाबाद यांच्या कडे कंत्राट असताना सब कंत्राटदार म्हणून श्री .उत्तरवार काम पहात आहेत. सब कंत्राटदारा मुळेचे या कामाचा संपूर्ण सत्यानाश झाला आहे असा आरोप विजय केनवडेकर यांनी केला आहे.

हा ठेकेदार पूर्णपणे आर्थिक अडचणीत असून सर्व बँकांमध्ये थकीत आहे त्यामुळे पुढील काम या ठेकेदाराकडून होणे शक्य नाही. या योजनेमार्फतच ३२ वेळा कामासाठी बिल दिले असून यंत्रसामुग्री आणण्यासाठी २ कोटी इतका निधी या ठेकेदाराला दिलेला होता. या ठेकेदाराने नगरपालिकेच्या सभेमध्ये आपण साहित्याची ऑर्डर दिली असून त्या संबंधित असणारे कागद सभागृहाला दाखवले होते . ३ वर्षे होऊनही एकही यंत्रसामुग्री नगरपालिकेकडे उपलब्ध झालेली नाही. यासंबंधी प्रशासनाने याला स्मरणपत्र दिले असता यासंबंधी कोणतेही उत्तर न देता वाढीव निधी उपलब्ध करून द्या तरच मी काम करू शकतो अशी अट घालून अरेरावीची भाषा करताना दिसत आहे.

‘STP-3 MLD’ चे प्रलंबीत पैसे घेऊन ठेका सोडण्याचा मनःस्थितीत ठेकेदार आहे. असे झाल्यास ठेकेदार व प्रशासनाच्या विरोधात जनयाचिका भाजपा मार्फेत दाखल करणार आहे.या ठेकेदाराकडून हा प्रकल्प पूर्ण होणार नसून याचे पुनर्लोकन करून उर्वरित कामाचे नवीन निविदा काढावी व या ठेकेदाराला काळ्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात यावे. पूर्ण कामाचे ऑडिट झाल्याशिवाय मालवण नगरपालिकेकडे असणारे अनामत रक्कम देण्यात येऊ नये अशी मागणी मा.रवींद्रचव्हाण पालकमंत्री सिंधुदुर्ग यांच्याकडे भाजपा तर्फ करण्यात आली आहे .

तसेच उर्वरित कामासाठी आवश्यक ४ कोटींचा निधी लवकरात लवकर मालवण नगरपालिकेला उपलब्ध करून देण्यात यावा अशी विनंती विजय केनवडेकर यांनी निवेदनात केली आहे . २००९ च्या प्रकल्प अहवाला प्रमाणे कोणताही ठेकेदार काम करण्यास तयार होणार नसून यासाठी वाढीव निधी उपलब्ध करून द्यावा व मागील ठेकेदाराचा पूर्णपणे चौकशी करावी. उर्वरित कामाची नविन निविदा तयार करण्यात यावी अशी विनंती पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना निवेदनात करण्यात आली आहे .

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

भुयारी गटार योजनेतील ठेकेदाराची चौकशी व्हावी व त्याला काळ्या यादीत टाकण्याची केली मागणी.

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण भाजपा शहर प्रभारी विजय केनवडेकर यांनी मालवण शहरातील भुयारी गटार योजनेबाबत पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना लेखी निवेदन दिले आहे. शहर प्रभारी विजय केनवडेकर यांनी त्यांच्या निवेदनात म्हणले की केंद्र शासनाकडील 'UIDSSMT' योजनेतून मालवण नगर परिषदेच्या भुयारी गटार योजना व सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प तेरा वर्षे होऊनही पूर्ण होऊ शकला नाही . यासंबंधी मालवण शहराला आवश्यक असणारी ही भुयारी गटार योजना होणे आवश्यक आहे व या उद्देशाने २६ ऑगस्ट २००९ ला सुरु झालेली ही योजना अजूनही पूर्ण होऊ शकली नाही आहे. या कामांमध्ये ठेकेदाराकडून होणारी दिरगाई कामाचं नसणारे नियोजन यामुळेच योजना मार्गस्थ होत नाही. प्रकल्पाच्या ८५% रक्कम अदा करूनही ठेकेदार काम करू शकला नाही तरिही या ठेकेदारावर कोणत्याही प्रकारची प्रशासकीय चौकशी न होता याच्यावर काम विलंबासाठी दंडात्मक कारवाई एकदाही झालेली नाही . श्री. व्ही. आर. घुगे, औरंगाबाद यांच्या कडे कंत्राट असताना सब कंत्राटदार म्हणून श्री .उत्तरवार काम पहात आहेत. सब कंत्राटदारा मुळेचे या कामाचा संपूर्ण सत्यानाश झाला आहे असा आरोप विजय केनवडेकर यांनी केला आहे.

हा ठेकेदार पूर्णपणे आर्थिक अडचणीत असून सर्व बँकांमध्ये थकीत आहे त्यामुळे पुढील काम या ठेकेदाराकडून होणे शक्य नाही. या योजनेमार्फतच ३२ वेळा कामासाठी बिल दिले असून यंत्रसामुग्री आणण्यासाठी २ कोटी इतका निधी या ठेकेदाराला दिलेला होता. या ठेकेदाराने नगरपालिकेच्या सभेमध्ये आपण साहित्याची ऑर्डर दिली असून त्या संबंधित असणारे कागद सभागृहाला दाखवले होते . ३ वर्षे होऊनही एकही यंत्रसामुग्री नगरपालिकेकडे उपलब्ध झालेली नाही. यासंबंधी प्रशासनाने याला स्मरणपत्र दिले असता यासंबंधी कोणतेही उत्तर न देता वाढीव निधी उपलब्ध करून द्या तरच मी काम करू शकतो अशी अट घालून अरेरावीची भाषा करताना दिसत आहे.

'STP-3 MLD' चे प्रलंबीत पैसे घेऊन ठेका सोडण्याचा मनःस्थितीत ठेकेदार आहे. असे झाल्यास ठेकेदार व प्रशासनाच्या विरोधात जनयाचिका भाजपा मार्फेत दाखल करणार आहे.या ठेकेदाराकडून हा प्रकल्प पूर्ण होणार नसून याचे पुनर्लोकन करून उर्वरित कामाचे नवीन निविदा काढावी व या ठेकेदाराला काळ्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात यावे. पूर्ण कामाचे ऑडिट झाल्याशिवाय मालवण नगरपालिकेकडे असणारे अनामत रक्कम देण्यात येऊ नये अशी मागणी मा.रवींद्रचव्हाण पालकमंत्री सिंधुदुर्ग यांच्याकडे भाजपा तर्फ करण्यात आली आहे .

तसेच उर्वरित कामासाठी आवश्यक ४ कोटींचा निधी लवकरात लवकर मालवण नगरपालिकेला उपलब्ध करून देण्यात यावा अशी विनंती विजय केनवडेकर यांनी निवेदनात केली आहे . २००९ च्या प्रकल्प अहवाला प्रमाणे कोणताही ठेकेदार काम करण्यास तयार होणार नसून यासाठी वाढीव निधी उपलब्ध करून द्यावा व मागील ठेकेदाराचा पूर्णपणे चौकशी करावी. उर्वरित कामाची नविन निविदा तयार करण्यात यावी अशी विनंती पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना निवेदनात करण्यात आली आहे .

error: Content is protected !!