कणकवली | उमेश परब : वेंगुर्ले तालुक्यातील अणसूर (रामघाट रोड) गावचे रहिवाशी आणि सेवानिवृत्त सामाजिक वनीकरण अधिकारी लाडोबा विश्राम चव्हाण (77) यांचे शनिवारी अल्पशा आजाराने वेंगुर्लेतील खाजगी रूग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले.
लाडोबा चव्हाण यांनी वनखात्यातून आपल्या सेवेस प्रारंभ केला. कणकवली तालुक्यात त्यांनी अनेक वर्षे वनपाल म्हणून नोकरी केली. त्यानंतर सामाजिक वनीकरण विभागाची स्थापना झाल्यानंतर या विभागातही त्यांनी सामाजिक वनीकरण अधिकारी म्हणून अनेक वर्षे काम केले. एक शिस्तप्रिय अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. सामाजिक वनीकरणच्या मुळदे येथील रोपवाटीकेत वनीकरण अधिकारी म्हणून कार्यरत असताना ते निवृत्त झाले होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सून, तीन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. श्री लाडोबा चव्हाण यांच्या निधनाने वेंगुर्ले परिसरांत शोक व्यक्त होत आहे