मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुका पंचायत समितीवर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे जोरदार निदर्शने करण्यात आली. आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनाचा उद्देश हा शिक्षक बदली धोरणामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक शिक्षकांची झालेली बदली व त्यामुळे जिल्ह्यातील १२१ शाळांमध्ये शिक्षकांची शून्य अनुपलब्धी असा होता तर काही शाळांमध्ये शिक्षकांची संख्या कमी झाली व त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार असून ती सर्वस्वी जबाबदारी शिक्षण मंत्र्यांची असल्याचेही आमदार वैभव नाईक यांनी स्पष्ट केले. सबब शिक्षण मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशीही मागणी यावेळी करण्यात आली.

यावेळी या आंदोलनात आमदार वैभव नाईक यांच्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी नगरसेवक व माजी बांधकाम सभापती यतीन खोत, माजी नगरसेवक व माजी बांधकाम सभापती मंदार केणी,नरेश हुले, सन्मेष परब, भाई कासवकर, उप तालुकाप्रमुख गणेश कुडाळकर , आमदार वैभव नाईक यांचे स्वीय सचिव श्री. नितीन राऊळ व श्री. अनंत पाटकर, युवा सेना समन्वयक मंदार ओरसकर तसेच असंख्य शिवसैनिक व शहर तसेच तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.