मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील मुणगे गांवच्या सांस्कृतिक परंपरेत आणखीन एक मानाचे पान जोडले गेले आहे. श्री देवी भगवती दशावतार नाट्य मंडळ देवगड मुणगे- डोंबिवलीचे संचालक प्रकाश पांडुरंग लब्दे यांना प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ लातूर यांच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण नुकतेच करण्यात आले. लातूर येथे अनेक मान्यवर या सोहळ्याला उपस्थित होते.

“मला मिळालेला राज्यस्तरीय पुरस्कार हा पुरस्कार माझा एकट्याचा नसून माझ्या सर्व सहकलाकारांचा आहे. तमाम मायबाप रसिक यांनी आमच्या पाठीवर मारलेली प्रेमाची थाप आहे. त्यामुळे ही रंगभूमीची सेवा आमच्याकडून अशीच घडत राहो. आई वडीलांचे आशीर्वाद आणि देवी भगवतीची कृपा सदैव पाठीशी राहूदे”, असे प्रतिपादन श्री देवी भगवती दशावतार नाट्य मंडळ देवगड मुणगे- डोंबिवलीचे संचालक प्रकाश पांडुरंग लब्दे यांनी येथे केले.

यावेळी प्रकाश लब्दे यांनी नोबल प्रोट्याकटीव्ह प्रा. लि. आणि श्री ग़ुलाम हुसैन, नोबल फॅमेली यांचे नोकरीत नेहमी सहकार्य लाभत असल्या बद्दल तसेच दशावतार मंडळातील सर्व कलाकारांचे आभार मानले. यावेळी सौ वैशाली पाटिल, लहुकुमार शिंदे, डी. टी. अंबेगावे तसेच सदस्य उपस्थित होते.