30.3 C
Mālvan
Monday, May 5, 2025
IMG-20250501-WA0008
IMG-20240531-WA0007

रोणापाल कालव्यात तरुणाचा मृतदेह ; मृत्यूचे कारण अस्पष्ट.

- Advertisement -
- Advertisement -

बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या रोणापाल – धनगरवाडी येथे कालव्याच्या पाण्यात आज शनिवारी दुपारी तरुणाचा मृतदेह आढळून आला. मंगेश धोंडू कोळापटे (३४, रा. रोणापाल धनगरवाडी) असे त्याचे नांव आहे. कालव्यात तो आंघोळीसाठी उतरला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, कालव्यात पाणी कमी असतानाही पाण्यात बुडून मृत्यू झाल्याबाबत साशंकता आहे.
    
कालव्यात कपडे धुण्यासाठी ठेवलेल्या दगडावर त्याचे चप्पल होते. बांदा पोलीस हवालदार टी. टी. कोळेकर, राजेश गवस यांनी पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आला. शवविच्छेदन अहवालानंतर मंगेशच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. घटनास्थळी रोणापाल ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या रोणापाल - धनगरवाडी येथे कालव्याच्या पाण्यात आज शनिवारी दुपारी तरुणाचा मृतदेह आढळून आला. मंगेश धोंडू कोळापटे (३४, रा. रोणापाल धनगरवाडी) असे त्याचे नांव आहे. कालव्यात तो आंघोळीसाठी उतरला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, कालव्यात पाणी कमी असतानाही पाण्यात बुडून मृत्यू झाल्याबाबत साशंकता आहे.
    
कालव्यात कपडे धुण्यासाठी ठेवलेल्या दगडावर त्याचे चप्पल होते. बांदा पोलीस हवालदार टी. टी. कोळेकर, राजेश गवस यांनी पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आला. शवविच्छेदन अहवालानंतर मंगेशच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. घटनास्थळी रोणापाल ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!