मसुरे | प्रतिनिधी
मसुरे गडघेरावाडी येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री भिकाजी शंकर बागवे (८९ वर्ष) यांचे राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. युवा प्रगतशील शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते प्रशांत बागवे यांचे ते वडील होते.