30.3 C
Mālvan
Tuesday, May 6, 2025
IMG-20250501-WA0008
IMG-20240531-WA0007

कागदपत्र पडताळणी वेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलिस भरतीत दोन ‘भामटे’ घुसल्याचे निष्पन्न ; गुन्हा दाखल.

- Advertisement -
- Advertisement -

चौके | अमोल गोसावी : सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाच्या मे २०२३ मधील भरतीत बोगस प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त असल्याचे प्रमाणपत्र सादर केल्याचे निष्पन्न झाले आहे .या घटनेची गंभीर दखल घेत एसपी सौरभ अग्रवाल यांच्या आदेशानुसार लातूर आणि बीड जिल्ह्यातील दोघांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्ञानेश्वर भाऊसाहेब सातपुते ( जाम्ब शिरूर कासार, जिल्हा बीड ) आणि कृष्णा राजेंद्र राचमले ( मावलगाव, अहमदपूर, जिल्हा लातूर ) अशी फसवणूक करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. सिंधुदुर्ग पोलीस भरतीसाठी भूकंपग्रस्त आणि प्रकल्पग्रस्त असल्याचा बोगस दाखला जोडला होता.हे दोघे उमेदवार पोलीस भरतीसाठी पात्र ठरले होते.पात्र उमेदवारांच्या सर्व शैक्षणिक आणि अन्य आरक्षण निहाय दाखल्याची पडताळणी करण्यात येते.

या दोन्ही उमेदवारांनी बोगस प्रमाणपत्र सादर केल्याचे पडताळणीत सिद्ध झाले आहे. त्यामुळे ज्ञानेश्वर सातपुते आणि कृष्णा राचमले यांच्यासह त्यांना मदत करणाऱ्यांवर फसवणुकीसह अन्य कलामांद्वारे सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोधासाठी सिंधुदुर्ग पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.

पोलिस दलासारख्या सुरक्षेच्या जबाबदार क्षेत्रात दाखल होण्यापूर्वीच दोन भामट्या वृत्तींचा वेळीच पर्दाफाश़ झाल्यामुळे सामाजिक क्षेत्रातील तज्ञांनी समाधान व्यक्त करत अशा वृत्तींना सहकार्य करणार्यांवर कठोर कारवाई व्हावी अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

चौके | अमोल गोसावी : सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाच्या मे २०२३ मधील भरतीत बोगस प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त असल्याचे प्रमाणपत्र सादर केल्याचे निष्पन्न झाले आहे .या घटनेची गंभीर दखल घेत एसपी सौरभ अग्रवाल यांच्या आदेशानुसार लातूर आणि बीड जिल्ह्यातील दोघांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्ञानेश्वर भाऊसाहेब सातपुते ( जाम्ब शिरूर कासार, जिल्हा बीड ) आणि कृष्णा राजेंद्र राचमले ( मावलगाव, अहमदपूर, जिल्हा लातूर ) अशी फसवणूक करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. सिंधुदुर्ग पोलीस भरतीसाठी भूकंपग्रस्त आणि प्रकल्पग्रस्त असल्याचा बोगस दाखला जोडला होता.हे दोघे उमेदवार पोलीस भरतीसाठी पात्र ठरले होते.पात्र उमेदवारांच्या सर्व शैक्षणिक आणि अन्य आरक्षण निहाय दाखल्याची पडताळणी करण्यात येते.

या दोन्ही उमेदवारांनी बोगस प्रमाणपत्र सादर केल्याचे पडताळणीत सिद्ध झाले आहे. त्यामुळे ज्ञानेश्वर सातपुते आणि कृष्णा राचमले यांच्यासह त्यांना मदत करणाऱ्यांवर फसवणुकीसह अन्य कलामांद्वारे सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोधासाठी सिंधुदुर्ग पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.

पोलिस दलासारख्या सुरक्षेच्या जबाबदार क्षेत्रात दाखल होण्यापूर्वीच दोन भामट्या वृत्तींचा वेळीच पर्दाफाश़ झाल्यामुळे सामाजिक क्षेत्रातील तज्ञांनी समाधान व्यक्त करत अशा वृत्तींना सहकार्य करणार्यांवर कठोर कारवाई व्हावी अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

error: Content is protected !!