क्रीडा | विशेष : आज आय.पि.एल.च्या दुपारी खेळल्या गेलेल्या महत्वाच्या सामन्यात सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि डेवॉन कॉनवेची अर्धशतकी खेळी आणि दीपक चहरने पटकावलेल्या ३ विकेट्सच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने दिल्ली कॅपिटलस् चा ७७ धावांनी दणदणीत पराभव केला. हा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळवण्यात आला होता. प्रथम फलंदाजी करतना चेन्नईने २२३ धावा केल्या आणि दिल्लीसमोर २२४ धावांचे आव्हान ठेवले हाेते. या विजयामुळे चेन्नईने दिमाखात ‘प्लेऑफ’मध्ये प्रवेश केला आहे.
गुजरात पाठोपाठ प्लेऑफमध्ये धडक मारणारा चेन्नई हा दुसरा संघ ठरला आहे. चेन्नईने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करत प्लेऑफमध्ये धडक मारली आहे. चेन्नईने १४ सामने खेळले यातील ८ सामन्यांमध्ये विजय मिळवला तर १ सामना पावसामुळे रद्द करण्यात आल्यामुळे १ गुण देण्यात आला होता. दिल्लीला पराभूत केल्यानंतर चेन्नईच्या एकूण गुणांची संध्या १७ इतकी झाली आहे.
दिल्लीकडून, डेव्हिड वॉर्नर ५८ चेंडूमध्ये ८६ , यश धुलने १५ चेंडूमध्ये १३ धावा, अक्षर पटेल ८ चेंडूमध्ये १५ धावा, पृथ्वी शॉ ७ चेंडूमध्ये ५ धावा, अमन खानने ७ चेंडूमध्ये ५ धावांचे योगदान दिले. चेन्नई कडून दीपक चहरने ३, मथीशा पथीराणाने २ तर रवींद्र जडेजा आणि तुषार देशपांडेने २ विकेट्स पटकावल्या.
तत्पूर्वी, चेन्नईकडून ऋतुराज गायकवाड ५० चेंडूमध्ये ७९ धावा, डेवॉन कॉनवे ५२ चेंडूमध्ये ८२ धावा तर शिवम दुबेने ९ चेंडूमध्ये २२ धावांचे योगदान दिले. दिल्लीकडून खलील अहमद, चेतन सकारिया आणि ऑनरीक नोर्खिया यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.