25.9 C
Mālvan
Tuesday, May 6, 2025
IMG-20240531-WA0007
IMG-20250501-WA0008

विमानतळ शुभारंभ होताच शिवसैनिकांचा जल्लोष

- Advertisement -
- Advertisement -

कणकवली | उमेश परब : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चिपी विमानतळाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात करण्यात आला. ठराविक नेते मंडळी आणि पदाधिकारी यांना हा सोहळा याची देही याची डोळा पाहण्याची अनुभवण्याची संधी मिळाली असताना सामान्य नागरिकांनाही हा सोहळा पाहता यावा यासाठी शिवसेना कणकवली तालुक्याच्या वतीने पटवर्धन चौक येथे एल इ डी स्क्रीन लावून चिपी विमानतळ शुभारंभ ऑनलाइन दाखवण्यात आला. चिपी विमानतळावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आगमन होताच ढोल ताश्यांचा गजर करत शिवसेनेच्या वतीने जल्लोष करण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुभारंभ होतच कणकवली पटवर्धन चौकात फटाके व घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. हा सोहळा याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी कणकवली वासीयांनी आवर्जून आपली उपस्थिती लावली होती. कोकण वासीयचं स्वप्न साकार होत असतानाच शिवसेनेच्या वतीने लाडू पेढे वाटत हा शुभारंभ सोहळा उत्साहात साजरा केला. यावेळी असंख्य शिवसैनिकांसह कणकवली तालुक्यातील नागरिक उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

कणकवली | उमेश परब : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चिपी विमानतळाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात करण्यात आला. ठराविक नेते मंडळी आणि पदाधिकारी यांना हा सोहळा याची देही याची डोळा पाहण्याची अनुभवण्याची संधी मिळाली असताना सामान्य नागरिकांनाही हा सोहळा पाहता यावा यासाठी शिवसेना कणकवली तालुक्याच्या वतीने पटवर्धन चौक येथे एल इ डी स्क्रीन लावून चिपी विमानतळ शुभारंभ ऑनलाइन दाखवण्यात आला. चिपी विमानतळावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आगमन होताच ढोल ताश्यांचा गजर करत शिवसेनेच्या वतीने जल्लोष करण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुभारंभ होतच कणकवली पटवर्धन चौकात फटाके व घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. हा सोहळा याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी कणकवली वासीयांनी आवर्जून आपली उपस्थिती लावली होती. कोकण वासीयचं स्वप्न साकार होत असतानाच शिवसेनेच्या वतीने लाडू पेढे वाटत हा शुभारंभ सोहळा उत्साहात साजरा केला. यावेळी असंख्य शिवसैनिकांसह कणकवली तालुक्यातील नागरिक उपस्थित होते.

error: Content is protected !!