बांदा : राकेश परब : काेराेना महामारीच्या गेल्या दाेन वर्षात चालू असलेल्या संकटातुन संपुर्ण देश सावरत आहे. या पार्श्वभूमीवर घटस्थापनेपासून दस-यापर्यत बांदा येथील कै. बाप्पा केसरकर यांच्या साईमंदिरात बाबांच्या पुण्यतिथी उत्सव साजरा हाेत आहे. यामध्ये साईचरीत्र वाचन, भजन, महाआरती असे धार्मिक कार्यक्रम
साजरे करण्यात येणार आहेत. यामध्ये खास २० वर्षावरील महिलांच्या साेमवार ११ ऑक्टोबरला सायंकाळी ७ वाजता श्री साईबाबा भक्त सेवा मंडळच्या वतीने कै. अनघा पांडुरंग स्वार यांच्या स्मरणार्थ अभंग व भक्ती गीत गायन स्पर्धेचे आयाेजन करण्यात आले आहे. या स्पर्थेचे प्रथम पारिताेषीक ३००० व चषक, द्वितीय २००० व चषक, त्रृतीय १००० व चषक व उत्तेजनार्थ आकर्षक बक्षिसे ही सर्व पारिताेषिके अनय स्वार, अंकिता स्वार यानी पुरस्कृत केली आहे. या स्पर्धेत महिला वर्गाने सहभागी व्हावे असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष राकेश केसरकर यानी केले आहे. या स्पर्धेसाठी दर्शना केसरकर 7378740842, प्रियांका हरमलकर 8411818167 , राजश्री तेंडंले 9765314426 यांच्याकडे संपर्क करावे असे आयोजकांनी आवाहन केले आहे.