मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वराड येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषी अधिकारी मालवण यांच्या वतीने भात शेती व गुणवत्ता सुधार प्रकल्पांतर्गत तालुकास्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या २६ एप्रिलला वराड ग्रामपंचायत नजीक सातेरी मंदिर हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. प्रदर्शन सकाळी ८ वाजल्या पासून सुरू होणार असून यामध्ये पौष्टिक तृण धान्य बाबत विविध प्रक्रिया पदार्थ तसेच त्यासंबंधी धान्य पिके यांची मांडणी करण्यात येणार आहे. स्थानिक स्तरावर उपलब्ध विविध प्रकारची फळे भाजीपाला विविध प्रकारचे धान्य तसेच शेतकऱ्यांकडे उत्पादित माल याची मांडणी करण्यात येणार आहे तसेच महाडिबीटी कृषि यांत्रिकीकरण व इतर ऑनलाईन योजनांचे अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध आहे.
बहुसंख्य शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन मालवण तालुका कृषी अधिकारी श्री विश्वनाथ गोसावी यांनी केले आहे.
फोटो : कृषी सांकेतीक गुगल सौजन्य .