खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांनी केले विशेष अभिनंदन.
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राष्ट्रवादी काॅग्रेसचे ज्येष्ठ नेते व्हिक्टर डांटस यांची सिंधुदुर्ग जिल्हा संघाच्या अध्यक्षपदी नुकतीच निवड झाली. काल वराड येथे त्यांचे खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांनी पुष्पगुच्छ देऊन विशेष अभिनंदन केले.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हा समन्वयक बाळा गावडे, बाबू टेंबुलकर, कमलाकर गावडे उपस्थित होते.