26.2 C
Mālvan
Saturday, September 21, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग तर्फे आयोजित जिल्हास्तरीय जयभीम गायन पार्टी स्पर्धेत ‘आम्रपाली शिवडाव’ ठरले अव्वल.

- Advertisement -
- Advertisement -

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : दर्पण प्रबोधिनी, सिंधुदुर्ग या संस्थेच्या वतीने लोककवी वामनदादा कर्डक जन्मशताब्दी वर्ष आणि संस्थेचे संस्थापक उत्तम पवार जन्मस्मरण दिनाचे औचित्य साधून ‘उत्तम पवार स्मृती-जागर क्रांती’ जिल्हास्तरीय जयभीम गायन पार्टी स्पर्धेत आम्रपाली गायन पार्टी,शिवडाव यांनी प्रथम क्रमांक पटकावला. ही स्पर्धा नुकतीच कणकवली येथे संपन्न झाली.

बुद्ध-फुले-शाहू आंबेडकर यांच्या विचारधारेचे विचारशील आणि कृतीशील क्रांतीचक्र असलेल्या दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग या सामाजिक संस्थेने आपल्या समाजाभिमुख उपक्रमांच्या माध्यमातून समाज मनात वैचारिक चळवळीचा नवा आयाम निर्माण केला आहे. त्याचबरोबर सांस्कृतिक चळवळही अधिक गतिमान होऊन भीमशाहिरांनी, जलसाकारांनी रुजवलेला प्रबोधनाचा वारसा गायनपार्टीच्या रूपाने पुनर्जीवित व्हावा, हा प्रामाणिक उद्देश डोळ्यासमोर ठेवून उत्तम पवार यांनी आंबेडकरी चळवळीतील लोककवी वामनदादा कर्डक यांच्या नावाने सुरू केलेली जयभीम गायन पार्टी स्पर्धा आता त्यांच्या निधनानंतरही सुरू आहे, जिल्ह्यातील अनेक संघ यामध्ये भाग घेत असतात. यावर्षी सुद्धा जिह्यातील काही निवडक संघांनी स्पर्धेत सहभाग घेत आपल्या गायनातून उत्तम पवार यांना आदरांजली अर्पण केली.

या स्पर्धेचे उद्घाटन निलम उत्तम पवार यांचे हस्ते झाले या प्रसंगी अध्यक्ष आनंद तांबे, राजेश कदम,प्रा.डाॅ.राजेंद्र मुंबरकर, भास्कर तांबे, श्रीधर तांबे,कृष्णकांत कदम,वसंत नाटळकर, प्रा.सिद्धार्थ तांबे, प्रज्ञा कदम, स्नेहल तांबे, डाॅ.व्ही.जी.कदम, संतोष तांबे, नितिन कल्याण कदम,किशोर कदम, सुनिल तांबे,श्रीधर तांबे, महेंद्र कदम ,विशाल हडकर, अनिल तांबे,विशाल कासले आदी मान्यवर संस्थेचे पदाधिकारी, ज्येष्ठ सल्लागार उपस्थित होते.

संस्थेचे उपाध्यक्ष नरेंद्र तांबे यांनी जयभीम गायन पार्टी स्पर्धेचे प्रास्ताविक करून संस्थेच्या सामाजिक सांस्कृतिक समाजाभिमुख उपक्रमांचा आढावा घेवून स्पर्धकांचेे स्वागत केले. सर्व स्पर्धकांना स्पर्धेची नियमावली सुधीर तांबे यांनी सांगितली. परीक्षक आणि स्पर्धक यांचे स्वागत केले.
स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे :
प्रथम क्रमांक-आम्रपाली गायन पार्टी,शिवडाव
द्वितीय क्रमांक-भीमसंगीत ग्रुप, कुडाळ
तृतीय क्रमांक-युवारंजन कलामंच, कणकवली
उत्तेजनार्थ- १)शांतिदूत मित्रमंडळ कणकवली, २)गीत झंकार ग्रुप ओटव
विजेत्या संघांना रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. या स्पर्धेसाठी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांकाना राजेश पुरूषोत्तम कदम ( रोख रक्कम १०,०००/व सन्मानचिन्ह)
जयंत श्रीधर तांबे (रोख रक्कम ७,०००/-व सन्मानचिन्ह), नरेंद्र वासुदेव तांबे (रोख रक्कम ५,०००/- व सन्मानचिन्ह) दिलीप भगवान कदम (रोख रक्कम प्रत्येकी १०००/- व सन्मानचिन्ह) तसेच सहभागी सर्व स्पर्धकांना संदेश कदम, राहुल कदम, प्रकाश किर्लोस्कर, राजन तांबे,राजन चव्हाण, दिनेश कदम ,गौरव कदम यांनी सन्मानचिन्हे पुरस्कृत केली होती.

या स्पर्धेचे परिक्षण महाराष्ट्रातील नामवंत गायक,कवी,संगीतकार दिलराज पवार, ज्येष्ठ संगीत विशारद अंकुश सांगेलकर, अशोक कदम,आणि भीमशाहीर जनीकुमार कांबळे यांनी केले. या स्पर्धेच्या निमित्ताने संस्थेचे हितचिंतक आणि ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आलेल्या सरपंच, उपसरपंच यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. यामध्ये सुभाष कदम(सरपंच कुवळे) सुशील कदम (सरपंच तरंदळे) दिपक कदम (सरपंच खुडी) प्रवीण तांबे (उपसरपंच शिरवल) यांना गावच्या सर्वांगीण विकासासाठी सन्मानचिन्ह देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. तसेच एम.बी.बी.एस. वैद्यकीय पदवी प्राप्त डाॅ.नेहाल चंद्रकांत तांबे, आणि पी.एच.डी. पदवीप्राप्त डाॅ.नंदू हेदुळकर यांचा ही विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी स्पर्धेच्या आयोजनासाठी विशेष सहकार्य करणार्‍या संस्था हितचिंतक,देणगीदारांचे, गाव संघटना प्रतिनिधींचे सन्मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी कणकवली परिसरातील सामाजिक,साहित्यिक, शैक्षणिक क्षेत्रातील कल्पना मलये, अभिजीत असरोंडकर, बाळू मेस्त्री, बी.एस.कदम, विनायक जाधव, संतोष कुडाळकर, महेंद्र पवार, प्रकाश बुचडे, महेंद्रकुमार आडोळे, संदीप पेंडुरकर, रविंद्र परब, तुषार हजारे आदी मान्यवर उपस्थित होते.
सन्मान सोहळ्यात सर्व विजयी व सहभागी स्पर्धकांना संस्थेचे अध्यक्ष आनंद तांबे यांनी शुभेच्छा देऊन सामाजिक, सांस्कृतिक चळवळ अधिक गतिमान करण्याचे आवाहन केले, राजेश कदम यांनी आपल्या मनोगतात संस्थेच्या वैचारिक प्रबोधनात सांस्कृतिक चळवळीतील लोककवी, गायक, कवी कलावंत यांच्या योगदानाची प्रेरणा घेऊन नवोदित कलावंतांनी सम्यक दिशेने पावले उचलावीत असे प्रतिपादन केले. स्पर्धेचे संपूर्ण सूत्रनिवेदन संदेश तांबे यांनी केले तर आभार सरचिटणीस सुभाष कदम यांनी मानले.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : दर्पण प्रबोधिनी, सिंधुदुर्ग या संस्थेच्या वतीने लोककवी वामनदादा कर्डक जन्मशताब्दी वर्ष आणि संस्थेचे संस्थापक उत्तम पवार जन्मस्मरण दिनाचे औचित्य साधून 'उत्तम पवार स्मृती-जागर क्रांती' जिल्हास्तरीय जयभीम गायन पार्टी स्पर्धेत आम्रपाली गायन पार्टी,शिवडाव यांनी प्रथम क्रमांक पटकावला. ही स्पर्धा नुकतीच कणकवली येथे संपन्न झाली.

बुद्ध-फुले-शाहू आंबेडकर यांच्या विचारधारेचे विचारशील आणि कृतीशील क्रांतीचक्र असलेल्या दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग या सामाजिक संस्थेने आपल्या समाजाभिमुख उपक्रमांच्या माध्यमातून समाज मनात वैचारिक चळवळीचा नवा आयाम निर्माण केला आहे. त्याचबरोबर सांस्कृतिक चळवळही अधिक गतिमान होऊन भीमशाहिरांनी, जलसाकारांनी रुजवलेला प्रबोधनाचा वारसा गायनपार्टीच्या रूपाने पुनर्जीवित व्हावा, हा प्रामाणिक उद्देश डोळ्यासमोर ठेवून उत्तम पवार यांनी आंबेडकरी चळवळीतील लोककवी वामनदादा कर्डक यांच्या नावाने सुरू केलेली जयभीम गायन पार्टी स्पर्धा आता त्यांच्या निधनानंतरही सुरू आहे, जिल्ह्यातील अनेक संघ यामध्ये भाग घेत असतात. यावर्षी सुद्धा जिह्यातील काही निवडक संघांनी स्पर्धेत सहभाग घेत आपल्या गायनातून उत्तम पवार यांना आदरांजली अर्पण केली.

या स्पर्धेचे उद्घाटन निलम उत्तम पवार यांचे हस्ते झाले या प्रसंगी अध्यक्ष आनंद तांबे, राजेश कदम,प्रा.डाॅ.राजेंद्र मुंबरकर, भास्कर तांबे, श्रीधर तांबे,कृष्णकांत कदम,वसंत नाटळकर, प्रा.सिद्धार्थ तांबे, प्रज्ञा कदम, स्नेहल तांबे, डाॅ.व्ही.जी.कदम, संतोष तांबे, नितिन कल्याण कदम,किशोर कदम, सुनिल तांबे,श्रीधर तांबे, महेंद्र कदम ,विशाल हडकर, अनिल तांबे,विशाल कासले आदी मान्यवर संस्थेचे पदाधिकारी, ज्येष्ठ सल्लागार उपस्थित होते.

संस्थेचे उपाध्यक्ष नरेंद्र तांबे यांनी जयभीम गायन पार्टी स्पर्धेचे प्रास्ताविक करून संस्थेच्या सामाजिक सांस्कृतिक समाजाभिमुख उपक्रमांचा आढावा घेवून स्पर्धकांचेे स्वागत केले. सर्व स्पर्धकांना स्पर्धेची नियमावली सुधीर तांबे यांनी सांगितली. परीक्षक आणि स्पर्धक यांचे स्वागत केले.
स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे :
प्रथम क्रमांक-आम्रपाली गायन पार्टी,शिवडाव
द्वितीय क्रमांक-भीमसंगीत ग्रुप, कुडाळ
तृतीय क्रमांक-युवारंजन कलामंच, कणकवली
उत्तेजनार्थ- १)शांतिदूत मित्रमंडळ कणकवली, २)गीत झंकार ग्रुप ओटव
विजेत्या संघांना रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. या स्पर्धेसाठी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांकाना राजेश पुरूषोत्तम कदम ( रोख रक्कम १०,०००/व सन्मानचिन्ह)
जयंत श्रीधर तांबे (रोख रक्कम ७,०००/-व सन्मानचिन्ह), नरेंद्र वासुदेव तांबे (रोख रक्कम ५,०००/- व सन्मानचिन्ह) दिलीप भगवान कदम (रोख रक्कम प्रत्येकी १०००/- व सन्मानचिन्ह) तसेच सहभागी सर्व स्पर्धकांना संदेश कदम, राहुल कदम, प्रकाश किर्लोस्कर, राजन तांबे,राजन चव्हाण, दिनेश कदम ,गौरव कदम यांनी सन्मानचिन्हे पुरस्कृत केली होती.

या स्पर्धेचे परिक्षण महाराष्ट्रातील नामवंत गायक,कवी,संगीतकार दिलराज पवार, ज्येष्ठ संगीत विशारद अंकुश सांगेलकर, अशोक कदम,आणि भीमशाहीर जनीकुमार कांबळे यांनी केले. या स्पर्धेच्या निमित्ताने संस्थेचे हितचिंतक आणि ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आलेल्या सरपंच, उपसरपंच यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. यामध्ये सुभाष कदम(सरपंच कुवळे) सुशील कदम (सरपंच तरंदळे) दिपक कदम (सरपंच खुडी) प्रवीण तांबे (उपसरपंच शिरवल) यांना गावच्या सर्वांगीण विकासासाठी सन्मानचिन्ह देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. तसेच एम.बी.बी.एस. वैद्यकीय पदवी प्राप्त डाॅ.नेहाल चंद्रकांत तांबे, आणि पी.एच.डी. पदवीप्राप्त डाॅ.नंदू हेदुळकर यांचा ही विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी स्पर्धेच्या आयोजनासाठी विशेष सहकार्य करणार्‍या संस्था हितचिंतक,देणगीदारांचे, गाव संघटना प्रतिनिधींचे सन्मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी कणकवली परिसरातील सामाजिक,साहित्यिक, शैक्षणिक क्षेत्रातील कल्पना मलये, अभिजीत असरोंडकर, बाळू मेस्त्री, बी.एस.कदम, विनायक जाधव, संतोष कुडाळकर, महेंद्र पवार, प्रकाश बुचडे, महेंद्रकुमार आडोळे, संदीप पेंडुरकर, रविंद्र परब, तुषार हजारे आदी मान्यवर उपस्थित होते.
सन्मान सोहळ्यात सर्व विजयी व सहभागी स्पर्धकांना संस्थेचे अध्यक्ष आनंद तांबे यांनी शुभेच्छा देऊन सामाजिक, सांस्कृतिक चळवळ अधिक गतिमान करण्याचे आवाहन केले, राजेश कदम यांनी आपल्या मनोगतात संस्थेच्या वैचारिक प्रबोधनात सांस्कृतिक चळवळीतील लोककवी, गायक, कवी कलावंत यांच्या योगदानाची प्रेरणा घेऊन नवोदित कलावंतांनी सम्यक दिशेने पावले उचलावीत असे प्रतिपादन केले. स्पर्धेचे संपूर्ण सूत्रनिवेदन संदेश तांबे यांनी केले तर आभार सरचिटणीस सुभाष कदम यांनी मानले.

error: Content is protected !!