हवामान खात्याने मुसळधार पावसाचाही दिला आहे इशारा…..!
मालवण | वैभव माणगांवकर : आज दिवसभर घटस्थापना व नवरात्रीची पहिली रात्र असा सामाजीक ,कौटुंबिक ,धार्मिक व अध्यात्मिक उत्साह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात असताना काही तालुक्यातील जिल्ह्यावासियांना रात्र अंधारात वावरत काढावी लागत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात विजेच्या कडकडाट होत आहे त्यामुळे ‘महापारेषण २२० केव्ही’ कोयना पासून खारेपाटणपर्यंत येणाऱ्या विद्युत वाहिनीत बिघाड झाला आहे.त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला असून तिथूनच विद्युतप्रवाह चालू झाल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात वीज पुरवठा सुरळीतपणे होईल असे महावितरण मंडळामार्फत सांगितले जात आहे..
हवामान खात्याने दिलेले इशाऱ्यानुसार पुढील दोन दिवस विजेच्या कडकडाटसह मुसळधार पाऊस पडण्याचीही शकत आहे. आज घटस्थापना म्हणजेच नवरात्रीच्या पहिल्या रात्री सायंकाळी ७:३० वाजता खंडीत झालेला विद्युत पुरवठा पुढील २ तास तरी येणार नसेल्याची प्राथमिक माहिती महावितरणकडून देण्यात आली आहे.