गुढीपाडवा तथा नववर्षाच्या आरंभाचे होते औचित्य.
बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा येथे गुढीपाडवा तथा हिंदू नववर्ष आरंभ दिवसाचे औचित्य साधून बांदा पतंजली योग समिती तर्फे बांदा शहरात योग प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते .
सर्वसामान्य लोकांपर्यंत योगासने, प्राणायाम आणि सूर्यनमस्कार याबाबत जागरूकता निर्माण होण्याच्या उद्देशाने या योग प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले .
सदर प्रभात फेरी मध्ये पतंजली योग समिती बांदाचे सर्व योग साधक आणि बांदा शहरातील इतर सर्व नागरिक यांनी सहभाग घेतला. ही प्रभात फेरी श्री देव बांदेश्वर मंदिर बांदा येथून सकाळी सात वाजता निघाली. नंतर छत्रपती संभाजी महाराज चौक, गवळी तिठा, गांधी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, जुनी ग्रामपंचायत इमारत च्या मार्गे पुन्हा श्री बांदेश्वर मंदिर येथे येऊन या योग प्रभात फेरी ची सांगता झाली.
या योग प्रभात फेरी मध्ये ‘करे योग…. रहे निरोग’,भारत माता की जय ,वंदे मातरम, जय श्रीराम आदी घोषणा देत सर्वांना हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. योग ही आपली संस्कृती आहे आणि योगाभ्यास करणे व इतरांना करावयास लावणे हे कार्य पतंजली योग समिती बांदा ने हाती घेतले आहे व या कार्याला सर्वच स्तरावर प्रतिसाद वाढत आहे असे योग समितीतर्फे सांगण्यात आले.