कोरोनाचे नियम पाळून दर्शनाचा लाभ घ्यायचे आवाहन
बांदा : राकेश परब : मडुरा येथील श्री देवी माऊली मंदिरात नवरात्रोत्सवा निमित्त गुरुवार ७ आँक्टोबर पासून विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार ७ रोजी मंदिरात घटस्थापना व धार्मिक कार्यक्रम, सायंकाळी ७ वाजल्यापासून विविध मंडळांची भजने होतील.
शुक्रवार ८ रोजी सायंकाळी ७ वा. भजन व रात्री ८.३० वा. बाळकृष्ण गोरे दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग होईल. शनिवार ९ रोजी सायंकाळी ७ वाजता भजन व रात्री ८.३० वा. चेंदवणकर दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. रविवार १० रोजी सायंकाळी स्थानिकांची भजने व रात्री ८.३० वा. सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब पुरस्कृत इन्सुली येथील श्री देवी माऊली दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग होईल.
सोमवार ११ रोजी सायंकाळी स्थानिकांची भजने व रात्री ८.३० वा. पार्सेकर दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. मंगळवार १२ रोजी सायंकाळी भजन व रात्री ८.३० वा. वेंगुर्ले येथील संगीत विशारद दिप्तेश मेस्त्री यांचा सुश्राव्य भजनाचा कार्यक्रम होणार आहे. बुधवार १३ रोजी सायंकाळी ७ वा. भजन, ८ वा. महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम व ८.३० वा. नाईक मोचेमाडकर दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग होईल. तसेच लकी ड्रॉ निकाल जाहीर होणार असून प्रथम तीन विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे.
शुक्रवार १५ रोजी दसरोत्सव साजरा होणार आहे. भाविकांनी शासनाचे कोरोना संदर्भातील सर्व नियमांचे पालन करुन श्री दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन नवरात्रोत्सव समिती अध्यक्ष अनंत परब व सचिव संतोष परब यांनी केले आहे.