24.6 C
Mālvan
Thursday, November 21, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

रेडी ग्रामदैवत माऊली मंदिराच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर ; मंदिर विश्वस्तांनी मानले भाजपाचे आभार .

- Advertisement -
- Advertisement -

प्रादेशिक पर्यटन योजने अंतर्गत मिळाली निधीसाठी मंजूरी.

विवेक परब | ब्युरो चीफ : महाराष्ट्र राज्यातील पर्यटनस्थळाच्या ठिकाणी पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी ‘प्रादेशिक पर्यटन योजने अंतर्गत’ २०२२ – २३ मध्ये जिल्हास्तरावरील कामांसाठी २१६३० .५१ लाख एवढ्या रक्कमेसाठी प्रशासकीय मान्यता देवून १०८१५.१९ लाख एवढा निधी २०२२ – २३ मध्ये संबंधित जिल्हाधिकारी यांना वितरीत करण्यास शासनाकडून मान्यता दिली आहे. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याला ८.९६ कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला असून वेंगुर्ले तालुक्यातील रेडी माऊली मंदिर परिसरात बहुउद्देशीय सभागृह व अन्नछत्र बांधणे यासाठी २.५० कोटी, तसेच रेडी माऊली मंदिर परिसरात भक्त निवास बांधणे व परिसर सुशोभीकरण करणे यासाठी २.५० कोटी अशापद्धतीने ५ कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्र शासनाने मंजूर केला आहे.

राज्याचे अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात या कामांना मंजुरी दिली तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री नाम.रविंद्र चव्हाण तसेच भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी या कामांना पक्षाच्या वतीने शिफारस दिली व पाठपुरावा केला याबद्दल भाजपा पक्षाचे आभार मानण्यासाठी माऊली मंदिराचे विश्वस्त व मानकरी यांनी भाजपा वेंगुर्ले कार्यालयात भेट देऊन जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई व तालुक्याध्यक्ष सुहास गवंडळकर यांना पुष्पगुच्छ देऊन आभार मानले.

यावेळी रेडी माऊली मंदिराचे विश्वस्त संदिप राणे, जि.प.सदस्य प्रीतेश राऊळ, देवस्थान चे मानकरी भानुदास राणे, आत्माराम राणे, सुहास राणे, अमोल राणे, कृणाल पिळणकर, प्रल्हाद रेडकर तसेच ता.उपाध्यक्ष मनवेल फर्नाडिस उपस्थित होते .

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

प्रादेशिक पर्यटन योजने अंतर्गत मिळाली निधीसाठी मंजूरी.

विवेक परब | ब्युरो चीफ : महाराष्ट्र राज्यातील पर्यटनस्थळाच्या ठिकाणी पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी 'प्रादेशिक पर्यटन योजने अंतर्गत' २०२२ - २३ मध्ये जिल्हास्तरावरील कामांसाठी २१६३० .५१ लाख एवढ्या रक्कमेसाठी प्रशासकीय मान्यता देवून १०८१५.१९ लाख एवढा निधी २०२२ - २३ मध्ये संबंधित जिल्हाधिकारी यांना वितरीत करण्यास शासनाकडून मान्यता दिली आहे. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याला ८.९६ कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला असून वेंगुर्ले तालुक्यातील रेडी माऊली मंदिर परिसरात बहुउद्देशीय सभागृह व अन्नछत्र बांधणे यासाठी २.५० कोटी, तसेच रेडी माऊली मंदिर परिसरात भक्त निवास बांधणे व परिसर सुशोभीकरण करणे यासाठी २.५० कोटी अशापद्धतीने ५ कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्र शासनाने मंजूर केला आहे.

राज्याचे अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात या कामांना मंजुरी दिली तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री नाम.रविंद्र चव्हाण तसेच भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी या कामांना पक्षाच्या वतीने शिफारस दिली व पाठपुरावा केला याबद्दल भाजपा पक्षाचे आभार मानण्यासाठी माऊली मंदिराचे विश्वस्त व मानकरी यांनी भाजपा वेंगुर्ले कार्यालयात भेट देऊन जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई व तालुक्याध्यक्ष सुहास गवंडळकर यांना पुष्पगुच्छ देऊन आभार मानले.

यावेळी रेडी माऊली मंदिराचे विश्वस्त संदिप राणे, जि.प.सदस्य प्रीतेश राऊळ, देवस्थान चे मानकरी भानुदास राणे, आत्माराम राणे, सुहास राणे, अमोल राणे, कृणाल पिळणकर, प्रल्हाद रेडकर तसेच ता.उपाध्यक्ष मनवेल फर्नाडिस उपस्थित होते .

error: Content is protected !!