संतोष साळसकर | सहसंपादक : गेली अनेक वर्षे देश परदेशात लोकप्रीय ठरलेला मुंबई येथील सतिश भिडे यांचा ‘गीत वीर विनायक’ कार्यक्रमाचे आयोजन तळेरे येथे विविध ठिकाणी करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम बुधवारी १५ फेब्रुवारीला तळेरे आणि खारेपाटण येथे सादर होणार आहे.
१९८२ पासून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित ‘गीत वीर विनायक’ हा संगीत कार्यक्रम भिडे सादर करतात. ३ हजारांचा टप्पा गाठणारा हा कार्यक्रम देश आणि विदेशातही झाला असून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनातील महत्वाचे प्रसंग निवेदन करुन ते सादर केले जातात. यामध्ये कोणत्याही राजकिय किंवा धर्म याविरुध्द काहीही बोलले जात नाही.
बुधवारी सकाळी ११ वामनराव महाडीक माध्यमिक विद्यालय येथे, दुपारी १२ वा. विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालय तळेरे येथे, दु. २ वा. खारेपाटण माध्यमिक विद्यालय येथे हा कार्यक्रम होणार आहे. तर सायंकाळी ७ वा. तळेरे येथील संवाद परिवाराच्या मधुकट्टा येथे हा कार्यक्रम सादर होईल.
या कार्यक्रमाला यापूर्वी सुधीर फडके, नानासाहेब धर्माधिकारी, गगनगिरी महाराज, स्वामी विद्यानंद, कसोटीवीर माधव मंत्री, स्वामी पुरुषोत्तमा नंद सरस्वती, विद्याधर गोखले तर दुबई येथे सादर झालेल्या कार्यक्रमाला भारताचे वाणिज्य दूत श्री. चाको अशा विविध मान्यवरांनी उपस्थिती लावून कार्यक्रमाचा आनंद घेतला आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.