आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत कुडाळ तालुका युवासेना कार्यकारिणीच्या प्रमुख निवडी जाहीर.
कुडाळ । देवेंद्र गावडे (उपसंपादक ) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुका युवासेना कार्यकारणिची बैठक आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत शासकीय विश्रामगृह, कुडाळ एम.आय.डी.सी. येथे काल संपन्न झाली. या बैठकीत कुडाळ तालुक्यातील कार्यकारिणी विषयी निर्णय घेतानाच, काही प्रमुख निवडी जाहीर करण्यात आल्या.
यामध्ये कुडाळ तालुका युवासेना उपतालुकाप्रमुख म्हणून सागर भोगटे व विनय गावडे यांची निवड करण्यात आली. तर तेंडोली युवासेना विभागप्रमुख म्हणून कौशल राऊळ यांची निवड करण्यात आली.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख तथा कुडाळ उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट, कुडाळ तालुका प्रमुख योगेश धुरी, नेरूर शिवसेना विभाग प्रमुख तथा माजी सरपंच शेखर गावडे, नेरूर उपविभाग प्रमुख तथा ग्रा.प. सदस्य प्रवीण नेरुरकर, श्याम परब, राम कांबळी तसेच कुडाळ तालुक्यातील सर्व युवासेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
आमदार वैभव नाईक यांनी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या.