25.9 C
Mālvan
Thursday, November 21, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

त्या डंपर चालकावर कडक कायदेशीर कारवाई करा : आ. वैभव नाईक यांचे मालवण पोलीस निरिक्षकांना निर्देश.

- Advertisement -
- Advertisement -

काळसे ग्रामस्थांसह आ.वैभव नाईक यांनी दिली मालवण पोलीस स्टेशनला भेट.

आ.वैभव नाईक यांनी अपघातातील दिवंगत रुक्मिणी काळसेकर कुटुंबीयांचे केले सांत्वन.

मालवण | सुयोग पंडित : काल ९ फेब्रुवारीच्या संध्याकाळी अख्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला हादरवलेल्या काळसे येथील डंपर अपघाताबाबत कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी आज सकाळी काळसे ग्रामस्थांसोबत मालवण पोलीस ठाण्याला भेट दिली. आमदार वैभव नाईक यांनी पोलीस निरीक्षक विजय यादव यांच्याशी चर्चा करत डंपर चालक बाबू खुराशी याच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले. डंपरची कागदपत्रे तपासणी करायला सांगितले. या अपघातात डंपरखाली सापडून काळसे रमाईनगर येथील रुक्मिणी काळसेकर या मृत्युमुखी पडल्याने आमदार वैभव नाईक यांनी दुःख व्यक्त करत काळसेकर कुटुंबियांचे सांत्वन केले. त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांशी संपर्क साधत अपघात स्थळी स्पीड ब्रेकर बसविण्याचे निर्देश दिले.

यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपतालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी नगरसेवक व बांधकाम सभापती मंदार केणी, शहर प्रमुख बाबी जोगी, तपस्वी मयेकर आणि काळसे ग्रामस्थ उपस्थित होते.

काळसे होबळीचा माळ येथे काल ६.३० च्या सुमारास बेबंद वेगाने येणाऱ्या डंपरने शेतातून काम करून घरी परतत असलेल्या ५ महिलांना पाठीमागून धडक दिली. या धडकेत डंपरखाली सापडून रुक्मिणी पांडुरंग काळसेकर (५०, रा. काळसे रमाईनगर) यांचा जागीच मृत्यू झाला. तर या अपघातात रुक्मिणी यांच्या सोबत चालणार्या चार महिला देखील जबर जखमी झाल्या होत्या.जखमींना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

काळसे ग्रामस्थांसह आ.वैभव नाईक यांनी दिली मालवण पोलीस स्टेशनला भेट.

आ.वैभव नाईक यांनी अपघातातील दिवंगत रुक्मिणी काळसेकर कुटुंबीयांचे केले सांत्वन.

मालवण | सुयोग पंडित : काल ९ फेब्रुवारीच्या संध्याकाळी अख्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला हादरवलेल्या काळसे येथील डंपर अपघाताबाबत कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी आज सकाळी काळसे ग्रामस्थांसोबत मालवण पोलीस ठाण्याला भेट दिली. आमदार वैभव नाईक यांनी पोलीस निरीक्षक विजय यादव यांच्याशी चर्चा करत डंपर चालक बाबू खुराशी याच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले. डंपरची कागदपत्रे तपासणी करायला सांगितले. या अपघातात डंपरखाली सापडून काळसे रमाईनगर येथील रुक्मिणी काळसेकर या मृत्युमुखी पडल्याने आमदार वैभव नाईक यांनी दुःख व्यक्त करत काळसेकर कुटुंबियांचे सांत्वन केले. त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांशी संपर्क साधत अपघात स्थळी स्पीड ब्रेकर बसविण्याचे निर्देश दिले.

यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपतालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी नगरसेवक व बांधकाम सभापती मंदार केणी, शहर प्रमुख बाबी जोगी, तपस्वी मयेकर आणि काळसे ग्रामस्थ उपस्थित होते.

काळसे होबळीचा माळ येथे काल ६.३० च्या सुमारास बेबंद वेगाने येणाऱ्या डंपरने शेतातून काम करून घरी परतत असलेल्या ५ महिलांना पाठीमागून धडक दिली. या धडकेत डंपरखाली सापडून रुक्मिणी पांडुरंग काळसेकर (५०, रा. काळसे रमाईनगर) यांचा जागीच मृत्यू झाला. तर या अपघातात रुक्मिणी यांच्या सोबत चालणार्या चार महिला देखील जबर जखमी झाल्या होत्या.जखमींना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते.

error: Content is protected !!