श्री संत शिरोमणी रविदास महाराज जयंती उत्सवा निमित्त महिलांसाठी ‘खेळ पैठणीचा ‘ स्पर्धेदरम्यान केले प्रतिपादन.
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाजाचे नेते सुजित जाधव यांनी श्री संत शिरोमणी रोहीदास जयंती उत्सव सोहळ्यातील ‘खेळ पैठणीचा’ या कार्यक्रमा दरम्यान महिला सशक्तीकरण , महिला एकत्रीकरण आणि एकंदर महिलांच्या सर्वसमावेशक सर्वांगीण प्रगतीसाठी चर्मकार समाजाची आदरयुक्त भूमिका स्पष्ट केली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथे ५ फेब्रुवारीला ‘सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज’ आयोजित श्री संत शिरोमणी रविदास महाराज जयंती उत्सव निमित्त दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात संध्याकाळच्या सत्रात महिलांसाठी ‘खेळ पैठणीचा’ ही चुरशीची व खेळीमेळीची स्पर्धा संपन्न झाली .
या कार्यक्रमाचे उद्घाटन शिवसेना युवासेना प्रमुख सुशांत नाईक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. त्या वेळी त्यांच्या सोबत चर्मकार समाज जिल्हा अध्यक्ष सुजित जाधव, मयुरी चव्हाण, रोशनी चव्हाण, सुप्रिया जाधव , सुभाष भंडारे, महेंद्र चव्हाण, सुनील जाधव, उपस्थित होते.
खेळ पैठणीचा कार्यक्रम सूत्रसंचालन मंगेश आरेकर यांनी केले तर पैठणी कार्यक्रमाचे सादरीकरण बाळू वालावलकर यांनी केले. कार्यक्रमासाठी प्रायोजक साठी कणकवलीतील प्रसिद्ध ‘वस्त्रमहाल वोग’ यांनी आकर्षक पैठणी प्रथम क्रमांक प्रायोजित केली. तर दुसऱ्या क्रमांकाचे प्रेशर कुकर ‘श्री. रोशन जाधव’ यांनी दिले तसेच तिसऱ्या क्रमांक साठी ‘एस.बी.मोबाईल’ यांच्या कडून ब्लू टूथ डिवाईस देण्यात आले .
खेळ पैठणीचा कार्यक्रम मध्ये ४५ महिलांनी सहभाग घेतला. बाळू वालावलकर यांच्या आकर्षक खेळांनी कार्यक्रमाची रंगत वाढली . या कार्यक्रमा दरम्यान नगर सेवक कन्हैया पारकर यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमासाठी पंच म्हणून प्रतीक्षा साटम , दिपाली घाडी, वैदही गुडेकर,संजना कोलते, दिव्या साळसकर यांनी काम पाहिले. पैठणीच्या खेळात महापैठणीची मानकरी सौ.नेहा बेबी ठरल्या दुसर्या क्रमांकाचे प्रेशर कुकरचे बक्षिस सौ.सुप्रिया सुजित जाधव यांना मिळाले. ते बक्षिस त्यांनी सौ. सुप्रिया जाधव या त्यांच्या भागातील जिजाबाई जाधव यांना दिले. जिजाबाई जाधव या आपल्या कुटुंबासाठी भंगार गाड्या भरून आपल्या मुलांना मोठे केले आजही त्या आपल्या कुटुंबाच्या आधार स्तंभ बनून काम करत आहे त्यासाठी सौ.सुप्रिया जाधव यांनी त्यांना आपले बक्षीस त्यांना देऊन त्यांचा सत्कार केला. या बद्दल सौ.सुप्रिया जाधव यांचीही विशेष प्रशंसा झाली. स्पर्धेतील तिसरा क्रमांक सौ. निलम नामदेव जाधव यांना मिळाला.
सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाजाच्या वतीने या पुढेही महिलांना प्रोत्साहन देणारे कार्यक्रम करण्याचे आश्वासन मंडळाच्या वतीने सुजित जाधव यांनी दिले. खेळ पैठणीचा कार्यक्रमाचे बक्षीस वितरण वेळी व्यासपीठावर शरद जाधव, नामदेव जाधव, अनिल जाधव, राजेंद्र चव्हाण, प्रकाश वाघेरकर, आनंद जाधव ,सी आर चव्हाण आणि चर्मकार समाज बांधव व सामाजिक मान्यवर उपस्थित होते.