कणकवलीत श्री संत रविदास शिरोमणी जयंती उत्सव मिरवणुक उत्साहाने संपन्न.
चर्मकार समाजाचे नेते सुजित जाधव यांनी श्री संत शिरोमणी रविदास महाराज यांचा पुतळा पंचायत समिती समोरील जागेत उभा करायची केली मागणी.
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली शहरात रविवारी ५ फेब्रुवारीला श्री संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती उत्सव साजरा झाला. जयंती उत्सवाच्या मिरवणुकीत सर्व सामाजिक घटकांनी सहभाग घेतला. श्री संत शिरोमणी रविदास महाराज यांनी ६५० वर्षांपूर्वी दिलेला समानतेचा विचार घेऊन सर्वांनी चालले पाहिजे असे सामाजिक आवाहन व उद्गार युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांनी यावेळी काढले.

चर्मकार समाजाचे नेते सुजित जाधव यांनी नगरपंचायत विरोधी गट नेते तथा नगरसेवक सुशांत नाईक यांच्याकडे कणकवली शहरात श्री. संत शिरोमणी रविदास महाराज यांचा पुतळा पंचायत समिती समोरील जागेत उभा करावा अशी मागणी केली.
तेव्हा सुशांत नाईक यांनी माननीय खासदार विनायक राऊत , आमदार वैभव नाईक आणि शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या माध्यमातून लवकरच शासन दरबारी मागणी करायचा आपण प्रयत्न करू असे आश्वासन देऊन दिले. नंतर पालखी मध्ये सहभाग घेत त्यांनी आपण चर्मकार समाजा सोबत कायम आहोत असे सांगितले.
या मिरवणुक सोहळ्याला त्यांच्या सोबत शिवसेना नेते संदेश पारकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा चर्मकार समाज जिल्हा अध्यक्ष सुजित जाधव, विजय चव्हाण, पंढरी जाधव, प्रकाश वाघेरकर, आनंद जाधव, शरद जाधव आणि असंख्य चर्मकार समाज बांधव उपस्थित होते.