मसुरे | प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल शनिवारी संध्याकाळी मसुरे देऊळवाडा येथील माऊली मंदिरात देवीचे आशिर्वाद घेतले. हे मंदिर हे धाटणीचे कौलारू असून आंगणेवाडी येथून श्री भराडी देवीचा आशिर्वाद घेऊन निघताना मुख्यमंत्री काही काळ या मंदिरात थांबले.
यावेळी त्यांनी भविष्यातील वाटचालीसाठी माऊली चरणी प्रार्थना केली. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, खासदार डॉ श्रीकांत शिंदे , सरपंच नरेंद्र सावंत, प्रसाद बागवे, श्री सावंत आदी उपस्थित होते.