संतोष साळसकर | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या तळेरे येथील रमाकांत आत्माराम तळेकर यांचे बुधवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. ते ७६ वर्षांचे होते. तळेरे आदर्श व्यापारी संघटनेचे ते ज्येष्ठ सदस्य होते. तळेरे येथे अनेक वर्षे त्यांनी व्यवसाय केला. त्यांच्या निधनानंतर तळेरे बाजारपेठ बंद ठेऊन श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. गुरुवारी सकाळी तळेरे स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या निधनाने जिल्ह्यातील उद्योग व्यापार क्षेत्रातून शोक व्यक्त होत आहे.