24.9 C
Mālvan
Friday, September 20, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

नगरसेवक आणि स्टाॅलधारक संघटनेच्या सचिवांमध्ये शाब्दिक बाचाबाची ; वैभववाडीतील स्टाॅलधारकांचे उपोषण.

- Advertisement -
- Advertisement -

अतिक्रमण करून उभारलेले स्टॉल हटविण्याची नगरपंचायतची ठाम भूमिका .

वैभववाडी | नवलराज काळे : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडील स्टाॅलधारकांचे आंदोलन सुरु आहे. अनेक कुटुंबाचा उदरनिर्वाह हा स्टाॅलवर अवलंबून आहे. त्यामुळे आधी स्टाॅलधारकांचे पुनर्वसन करा. पुनर्वसनाची लेखी हमी मिळत नाही. तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही. अशी आक्रमक भूमिका स्टाॅलधारकांनी घेतली आहे. तर पुनर्वसनाचे आश्वासन देऊ शकत नाही. मात्र कर्तव्य म्हणून त्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करु. शहराच्या विकासासाठी जबाबदार नागरीक म्हणून नगरपंचायतीला सहकार्य करावे. अशी भूमिका नगरपंचायतीच्यावतीने घेण्यात आली आहे. त्यामुळे रात्री उशीरापर्यंत स्टाॅलधारकांचे उपोषण सुरु होते.

वैभववाडी शहरात अतिक्रमण करुन उभारलेले स्टाॅल हटविण्यासाठी नगरपंचायतीच्यावतीने स्टाॅलधारकांना नोटीस दिल्या आहेत. यावर स्टाॅलधारक आक्रमक झाले असून स्टाॅल धारकांचे पुनर्वसन झाल्याशिवाय स्टाॅल हटविण्यात येऊ नये अशी आक्रमक भूमिका घेत काल गुरुवारी सकाळी ११ वा.पासून नगरपंचायत समोर सचिव अभिजीत पवार यांच्या नेतृत्वाखाली उपोषणास सुरुवात केली आहे. या उपोषणात शहरातील स्टाॅलधारक मोठ्यासंख्येने उपस्थित होते. दुपारी नगराध्यक्षा नेहा माईणकर, उपनगराध्यक्ष संजय सावंत, समिती सभापती विवेक रावराणे, मुख्याधिकारी सूरज कांबळे यांनी उपोषणकर्त्या आंदोलकांची भेट घेतली. यावेळी स्टाॅलधारकांनी आपली बाजू मांडली. शहरात गेली अनेक वर्षे आम्ही रोजगार करीत असून यावर आमच्या कुटुंबाची रोजीरोटी सुरु आहे. त्यामुळे शहराचा विकास करीत असतानाच आमचा विचार प्रथम करावा. आधी पुनर्वसन करावे. मगच पुढची कारवाई करावी. अशी मागणी लावून धरली.

नगरपंचायतीने नोटीस देण्या अगोदर स्टाॅल धारकांशी चर्चा करायला हवी होती. विकासाला विरोध नाही. परंतु या स्टाॕलधारकांचा विचार व्हायला हवा. त्यांचे पुनर्वसन करा. अनेक कुटुंबे उध्वस्त होणार आहेत. यासाठी आमदार नितेश राणे, नगरसेवक, स्टाॅलधारक यांच्यात बैठक घेऊन तोडगा काढा अशी भूमिका जयेंद्र रावराणे यांनी मांडली.

तर मुख्याधिकारी सुरज कांबळे यांनी सांगितले. नगरपंचायत हदीतील अतिक्रमण काढणे ही नगरपंचायतीची जबाबदारी आहे. तसे शासनाचे स्पष्ट आदेश आहेत. तसेच नगरपंचायतीने दिनांक १५ मार्च २०२२ ला तसा एकमुखी ठराव केला आहे. त्याची अंमलबाजवणी प्रशासन करीत आहे. वर्षभरापासून तीन नोटीस स्टाॕल धारकांना देण्यात आल्या आहेत. शिवाय अतिक्रमण असल्यामुळे त्यांच्या पुनर्वसनाचे आश्वासन देता येणार नाही. माञ नगरपंचायत कतर्व्य भावनेतून त्यांचा विचार करण्यात येईल. त्यामुळे जबाबदार नागरीक म्हणून आपण नगरपंचायतीला सहकार्य करावे. अशी भुमिका मांडली. त्यामुळे या चर्चेतून कोणताच पर्याय निघाला नाही. त्यामुळे उशीरापर्यंत उपोषाण सुरु होते. दरम्यान नगरसेवक प्रदीप रावराणे यांनी बोलण्याचा प्रयत्न केला असता, स्टाॅल धारक संघटनेचे सचिव पवार यांनी तू बोलु नकोस अस म्हटल्यामुळे या दोघांमध्ये तू तु मी मी झाले. मात्र उपस्थित इतरांनी दोघांनाही शांत केले व सामोपचाराने चर्चा सुरु ठेवायचे आवाहन केले.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!