मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या सर्जेकोट मिर्याबांदा शाळेतील विद्यार्थ्यांनी
रेवंडी येथील माघी गणेश जयंती दरम्यान श्री देवी भद्रकाली रंगमंच्यावर ‘गोकुळचा चोर ‘ हा दशावतार नाट्य प्रयोग सादर केला. दशावतार प्रयोगातील विद्यार्थ्यांनी आपल्या अभिनयाने रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. शाळेचे पदवीधर मुख्याध्यापक श्रीकृष्ण बागवे यांनी अंगभूत अभिनयाच्या अनुभवावरून दिग्दर्शनाची बाजू सांभाळली. संगीत साथ हार्मोनियम वितेश घाडीगांवकर, झांजवादक कु.निखिल घाडीगांवकर , मृदुंगसाथ भाऊ चव्हाण यांनी दिली. रंगभूषा सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय कलावंत श्री. तारक कांबळी यांनी केली. वेशभूषेसाठी बलभीम मंडळ व सर्जेकोट ग्रामस्थ यांनी मोलाचे सहकार्य केले. या दशावतार नाट्य प्रयोगात सूरज चेंदवणकर, यतिन करवडकर, अथर्व जामसंडेकर, खुशी कांबळी, श्रीकृष्ण पराडकर, सामचंद्र पराडकर, चिन्मय फोंडबा, ओंकार आचरेकर, मयुरी गावडे, मिहिर मेस्त्री, वेदांत मेस्त्री, आराध्य थोरत, रुद्र खडपकर, चेतन सावंत यांनी भूमिका साकारल्या.
शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.महेश पराडकर,श्री.युवराज आडकर ,श्री.बाबू परुळेकर, श्री.सुबोध केळुसकर,श्री.स्वप्नील केळुसकर श्री.ज्ञानेश्वर पराडकर यांचे विशेष सहकार्य लाभले. सर्जेकोट मिर्याबांदा सरपंच सौ.निलिमा परूळेकर , उपसरपंच श्री.सुनिल खवणेकर व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.रेवंडी पंचक्रोशीतील रसिक प्रक्षेकांनी बक्षिसांची खैरात करत दिग्दर्शक मुख्याध्यापक श्री.श्रीकृष्ण बागवे यांनाही रोख बक्षिसांने सन्मानीत केले. तसेच रेवंडी गावातील त्यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव करत श्री.युवराज कांबळी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पदवीधर शिक्षिका सौ.श्रद्धा श्रीकृष्ण बागवे यांनीही या नाट्यप्रयोगासाठी खूप मेहनत घेतली होती. श्री.मोहन सावंत यांचेही विशेष सहकार्य लाभले होते. हा दशावतार नाट्यप्रयोग श्री देवी भद्रकाली देवस्थान रेवंडीचे पदाधिकारी, श्री. विजय कांबळी, नरेश करलकर व संस्था कमिटी यांच्या मागणीवरुन सादर करण्यात आला.