बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाफोली ग्रामस्थ हितवर्धक संस्था, मुंबई संस्थेने गेली ४६ वर्षे गावाच्या विविध विकासाच्या उपक्रमांमध्ये संस्थेचे भरीव योगदान देते आहे. संस्थेचे वार्षिक स्नेहसंमेलन मुंबई येथे संपन्न झाले. वाफोलीतील मुंबईस्थित ग्रामस्थांच्या किंवा गावातील वेगवेगळ्या शैक्षणिक तसेच सामाजिक उपक्रमांना संस्थेचा नेहमीच पाठिंबा असतो. संस्थेने वाफोली जिल्हा परिषद शाळा नंबर १ आणि २ या शाळांचे रंगकाम करण्यासाठी ऑक्टोबर २०२२ मध्ये प्रत्येकी २५ हजार रुपयाची देणगी आर्थिक मदत केली. यावेळी शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षक,संस्थेचे पदाधिकारी आणि सदस्य, ज्येष्ठ ग्रामस्थमंडळी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. या देणगीतून दोन्ही शाळातील रंगकाम पूर्ण झाले असून दोन्ही शाळांच्या इमारती अधिक सुबक व सुंदर झाल्या आहेत.संस्थेच्या नावातील हितवर्धक या शब्दाला साजेसे काम संस्था नेहमीच करत आली आहे. संस्थेच्या या मदतीबद्दल व स्नेहसंमेलनास दोन्ही शाळांचे मुख्याध्यापक तसेच ग्राम शिक्षण कमिटी आणि वाफोली गावातील ग्रामस्थांनी संस्थेचे आभार मानले व पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -