बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा येथील ‘नट वाचनालय’ येथे १४ जानेवारी ते २८ जानेवारी २०२३ या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. या कार्यक्रमाचा एक भाग म्हणुन वाचनालयात धार्मिक ग्रंथाचे प्रदर्शन मांडण्यात आले. यावेळी नट वाचनालयाचे अध्यक्षीय एस. आर. सावंत यांच्या हस्ते दीपप्रज्वलाने उदघाटन करण्यात आले.
या कार्यक्रमात मान्यवर म्हणुन अनंत भाटे यांनी आपले विचार मांंडताना मराठीसृष्टी भाषा हि सर्वात जुनी भाषा असुन आपल्या या माय भाषेच्या सवर्घनाची आवश्यकता असल्याचे सांगीतले. एस आर सावंत यानी बोलताना भाषा हे विचारांची देवाण घेवाण करण्याचे साधन असुन त्या भाषेचा इतीहास जाणुन घेणे गरजेचे आहे. मराठी भाषेच्या सवंर्धनात ग्रंथामधे महत्वाची भुमीका बजावत असल्याचे सांगीतले. महाबळेश्वर सामंत यानीही आपले मौलीक विचार मांडले. या कार्यक्रमास राकेश केसरकर, हेमंत मोर्ये, जगन्नाथ सातोसकर, प्रकाश पाणदरे, अंकुश मांजगावकर, शंकर नार्वेकर, निलेश मोरजकर, सौ स्वप्निता सावंत, सो प्रमिला मोरजकर/नाईक, सौ अमिता परब, सूनिल नातू, ओंकार राऊळ उपस्थित होते. राकेश केसरकर यांनी सर्वांचे आभार मानले.