बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या बांदा येथिल श्री पिंपळेश्वर गणपती मंदिरात
आज २५ जानेवारी २०२३ रोजी माघी गणेश जयंती उत्सवाचा आरंभ झाला आहे. या सोहळ्या निमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले आहेत.
आज पहाटे ५.०० वाजता-काकड आरती, अभिषेक व पुजा ,सकाळी ८.३० वाजता-श्री गणेश पूजा,
सकाळी ९.०० वाजता-श्री सत्यनारायण महापुजा असे धार्मिक विधी व कार्यक्रम संपन्न झाले आहेत.
दुपारी १.०० वाजता-महाआरती व महाप्रसाद
सायंकाळी ४.३० वाजता – सुश्राव्य भजनाचा कार्यक्रम ,तर सायंकाळी ६.३० वाजता-सायं आरती होईल.रात्रौ ८.०० वाजता
सावरेश्वर दशावतार नाट्यमंडळ, आवेरा, ता. वेंगुर्ला यांचा
‘वक्रतुंड’ पौराणिक नाट्यप्रयोग सादर करण्यात येणार आहे.
भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन श्री पिंपळेश्वर गणपती मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.