संतोष साळसकर | सहसंपादक : ग्लोबल हिप्नोथेरपी असोसिएशन या संघटनेचे सदस्य म्हणून तळेरे येथील ज्येष्ठ एज्युकेशनल ॲडव्हायजर सदाशिव पांचाळ यांची नेमणूक केली आहे. या संघटनेची सदस्यता मिळवणारे सदाशिव पांचाळ हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहीलेच आहेत. त्यांना हा मान मिळणे हा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा संन्मान आहे.
या संदर्भात संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष क्लिनिकल सायकॉलॉजीस्ट प्रा. रोहित अंधारे, राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. शरणबसप्पा खानापुरे, तसेच महाराष्ट्र राज्य विभागिय अध्यक्ष डॉ. सचिन राणे अशा त्रयींच्या सहीचे पत्र संघटनेचे राष्ट्रीय सचिव क्रांतीदीप लोंढे यांनी सदाशिव पांचाळ यांना पाठवले आहे.
मुळचे पियाळी गावचे पण सद्या तळेरे येथे वास्तव्यास असलेले सदाशिव पांचाळ हे गेली २० वर्षे विद्यार्थ्यांच्या बौध्दिक क्षमता विकसित करण्यासाठी महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक अशा तीन राज्यांमध्ये कार्यरत आहेत. आतापर्यंत एक हजार पेक्षा अधिक कार्यशाळा तसेच छोट्या कार्यक्रमातून अनेक शाळा, हायस्कूल तसेच कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना घडवण्याचे काम करत आहेत. फक्त विद्यार्थीच नव्हे तर पालकांसाठी व शिक्षकांसाठी सुध्दा त्यांनी मार्गदर्शक कार्यशाळांचे यशस्वी आयोजन केले आहे.