संतोष साळसकर | सहसंपादक : टाळ मृदुंगाच्या गजरात, विठ्ठलनामाच्या अखंड जयघोषात देवगड तालुक्यातील शिरगाव वारकरी संप्रदायाची माघवारी पायी दिंडीने गुरुवारी सकाळी शिरगाव बाजारपेठ येथील श्री हनुमान मंदिर येथून श्रीक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान केले. शिरगांव गावचे ग्रामदैवत श्री पावणाई देवीच्या देवालयात प्रथम श्रीफळ व विनंती ठेवून माघवारी पायी दिंडीचा शुभारंभ करण्यात आला.
सकाळी बाजारपेठेतील श्री हनुमान मंदिरात शिरगाव दशक्रोशीतील वारकरी माऊली, ग्रामस्थ, विविधक्षेत्रांतील मान्यवर एकत्र येऊन हरीपाठ व आरतीचा कार्यक्रम पार पडला. हनुमान मंदिरास प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर पायी दिंडीचे श्रीक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान झाले. यावेळी
शिरगाव बसस्थानकासमोर दिंडी आल्यानंतर ‘दिंडी चालली… चालली.. चालली… पंढरपुरा, हरी मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी यांसारखे वारकरी अभंग गात विठूनामाच्या जयघोषात रिंगण केले. दिंडीत सहभागी झालेल्या वारकरी माऊलींना शुभेच्छा देण्यासाठी
क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
विठ्ठलनामाच्या
गजरात पहाटेपासूनच शिरगावनगरी दुमदुमून निघाली होती. या दिंंडीने शिरगाव , आंबेखोल, हडपिड, कोळोशी, नांदगाव येथून कणकवली तालुक्यातील लोरे नं. १ कडे प्रस्थान केले.