25.9 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007

डाव्होस मध्ये पहिल्याच दिवशी महाराष्ट्रासाठी तब्बल ४५,९०० करोडची गुंतवणूक ; उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती.

- Advertisement -
- Advertisement -

डाव्होसमधील ‘महाराष्ट्र पॅवेलीअन’ आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी सज्ज…!

मुंबई | ब्युरो न्यूज : स्वित्झर्लंड येथील डाव्होस शहरातील ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत पहिल्याच दिवशी महाराष्ट्र राज्यामध्ये अंदाजे ४५९०० कोटींची गुंतवणूक करण्यात आल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी येथे दिली.

श्री. सामंत म्हणाले, डाव्होस येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी आगमन झाले असून त्यांनी डाव्होस येथे सज्ज असलेल्या महाराष्ट्र पॅव्हेलियन’ला भेट दिली. महाराष्ट्र पॅव्हेलियनमध्ये राज्याच्या विकासाचे प्रभावी दर्शन घडवले जाणार असून महत्वाच्या उद्योगांसमवेत येथे सामंजस्य करारही केले जाणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज विविध कंपन्यां समवेत सामंजस्य करार करण्यात आले असून या माध्यमातून सुमारे १०,००० तरूणांच्या हाताला काम मिळणार असल्याची माहिती श्री. सामंत यांनी सांगितली. यावेळी, प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, एमआयडीसी मुख्य कार्यकारी अधिकारी विपिन शर्मा, टी. कृष्णा, श्रे ॲरन, आशीष नवडे, स्टीफन व सर्व संबंधित उपस्थित होते.

यावेळी करण्यात आलेल्या सामंजस्य कराराबद्दल सविस्तर कंपनी सहित प्रकल्प अनुक्रमे ग्रीनको ऊर्जा प्रकल्प ,प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची १२००० कोटींची गुंतवणूक, बर्कशायर हॅथवे होम सर्विसेस ओरेंडा,इंडिया कंपनीची १६००० कोटींची गुंतवणूक, आय.सी.पी.इन्वेस्टमेंटस् / इंडस् कॅपिटल आस्थापनाची १६००० कोटींची गुंतवणूक,
रुक़ी फूडस् कंपनीची 250 कोटींची गुंतवणूक ,निप्रो फार्मा पॅकेजींग,इंडिया प्रायव्हेट लिमिटेड १६५० कोटींची गुंतवणूक असे आहेत.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

डाव्होसमधील 'महाराष्ट्र पॅवेलीअन' आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी सज्ज…!

मुंबई | ब्युरो न्यूज : स्वित्झर्लंड येथील डाव्होस शहरातील 'वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम'च्या विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत पहिल्याच दिवशी महाराष्ट्र राज्यामध्ये अंदाजे ४५९०० कोटींची गुंतवणूक करण्यात आल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी येथे दिली.

श्री. सामंत म्हणाले, डाव्होस येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम'च्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी आगमन झाले असून त्यांनी डाव्होस येथे सज्ज असलेल्या महाराष्ट्र पॅव्हेलियन’ला भेट दिली. महाराष्ट्र पॅव्हेलियनमध्ये राज्याच्या विकासाचे प्रभावी दर्शन घडवले जाणार असून महत्वाच्या उद्योगांसमवेत येथे सामंजस्य करारही केले जाणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज विविध कंपन्यां समवेत सामंजस्य करार करण्यात आले असून या माध्यमातून सुमारे १०,००० तरूणांच्या हाताला काम मिळणार असल्याची माहिती श्री. सामंत यांनी सांगितली. यावेळी, प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, एमआयडीसी मुख्य कार्यकारी अधिकारी विपिन शर्मा, टी. कृष्णा, श्रे ॲरन, आशीष नवडे, स्टीफन व सर्व संबंधित उपस्थित होते.

यावेळी करण्यात आलेल्या सामंजस्य कराराबद्दल सविस्तर कंपनी सहित प्रकल्प अनुक्रमे ग्रीनको ऊर्जा प्रकल्प ,प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची १२००० कोटींची गुंतवणूक, बर्कशायर हॅथवे होम सर्विसेस ओरेंडा,इंडिया कंपनीची १६००० कोटींची गुंतवणूक, आय.सी.पी.इन्वेस्टमेंटस् / इंडस् कॅपिटल आस्थापनाची १६००० कोटींची गुंतवणूक,
रुक़ी फूडस् कंपनीची 250 कोटींची गुंतवणूक ,निप्रो फार्मा पॅकेजींग,इंडिया प्रायव्हेट लिमिटेड १६५० कोटींची गुंतवणूक असे आहेत.

error: Content is protected !!