30.1 C
Mālvan
Sunday, May 4, 2025
IMG-20240531-WA0007
IMG-20250501-WA0008

मनसेच्या वतीने मालवण तहसीलदार श्रीधर पाटील यांचा धाडसी कार्यपद्धतीबद्दल सत्कार.

- Advertisement -
- Advertisement -

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात अनधिकृत वाळू,चिरा व्यवसायावर महसूल विभागाचा कारवाईचा बडगा गेले दोन आठवडे सुरु आहे . दिखावू कारवाई न करता आरटीओ तसेच संबंधिताना नोटीसा देत प्रत्यक्ष कृतीने पाठपुरावा करणाऱ्या मालवण तहसीलदार श्रीधर पाटील यांचा मनसेच्यावतीने शाल व पुष्पगुच्छ देत सत्कार करण्यात आला.

गेले अनेक दिवस तालुक्यात अनधिकृत वाळूव्यवसाय होत असताना रोज १३५ ते १५० डंपर ये-जा करत होते.बेळणे आचरा येथे अनधिकृत चिरा वाहतुकीवर तसेच देवली येथे अनधिकृत वाळूचा साठा नेण्यासाठी आलेले २८ डंपर महसूल विभागाने छापा टाकून ताब्यात घेतले होते.लपवून ठेवलेला आणखी ८० ब्रास वाळू साठा देखील महसूल विभागाने जप्त केला.वाळू माफियांना न जुमानता पोलिसांच्या सहकार्याने मध्यरात्रीपासून तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात येत होती.तहसीलदार श्रीधर पाटील यांनी दाखवलेल्या या धाडसाबद्दल मनसेच्यावतीने सत्कार करण्यात आला.यावेळी मनसेचे अमित इब्रामपूरकर, माजी तालुका सचिव विल्सन गिरकर,माजी तालुकाध्यक्ष रामनाथ पराडकर,प्रशांत पराडकर,नितीन खानोलकर आदी उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात अनधिकृत वाळू,चिरा व्यवसायावर महसूल विभागाचा कारवाईचा बडगा गेले दोन आठवडे सुरु आहे . दिखावू कारवाई न करता आरटीओ तसेच संबंधिताना नोटीसा देत प्रत्यक्ष कृतीने पाठपुरावा करणाऱ्या मालवण तहसीलदार श्रीधर पाटील यांचा मनसेच्यावतीने शाल व पुष्पगुच्छ देत सत्कार करण्यात आला.

गेले अनेक दिवस तालुक्यात अनधिकृत वाळूव्यवसाय होत असताना रोज १३५ ते १५० डंपर ये-जा करत होते.बेळणे आचरा येथे अनधिकृत चिरा वाहतुकीवर तसेच देवली येथे अनधिकृत वाळूचा साठा नेण्यासाठी आलेले २८ डंपर महसूल विभागाने छापा टाकून ताब्यात घेतले होते.लपवून ठेवलेला आणखी ८० ब्रास वाळू साठा देखील महसूल विभागाने जप्त केला.वाळू माफियांना न जुमानता पोलिसांच्या सहकार्याने मध्यरात्रीपासून तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात येत होती.तहसीलदार श्रीधर पाटील यांनी दाखवलेल्या या धाडसाबद्दल मनसेच्यावतीने सत्कार करण्यात आला.यावेळी मनसेचे अमित इब्रामपूरकर, माजी तालुका सचिव विल्सन गिरकर,माजी तालुकाध्यक्ष रामनाथ पराडकर,प्रशांत पराडकर,नितीन खानोलकर आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!